पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे रविवारी पहाटे भुईंज येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. विविध मान्यवरांसह प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत भुईंज येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे सुपूत्र मदन भोसले यांच्यासह मोहन भोसले, गजानन भोसले यांनी मुखाग्नी दिला.
सलग चार वेळा वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कॅबिनेट मंत्री, सातारा लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद तसेच विविध राज्य व केंद्रीय समित्यांचे अध्यक्षपद भूषविणार्या प्रतापराव भोसले यांनी संपूर्ण कारकिर्दीत कधीच कोणता किंचितसा डाग लावून घेतला नाही. तळागाळातील जनतेचा विचार करता साामाजिक, सहकार, कृषी, शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनमोल योगदान दिले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भुईंज येथील निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी उसळली. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सौ. सुनेत्रा पवार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेद्रसिंह हुडा यांनी फोन व शोकसंदेशाद्वारे शोक व्यक्त केला.
फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यानंतर अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. अशा शोकाकुल वातावरणात निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत हजारांचो जनसमुदाय सहभागी झाला होता.
अंत्यसंस्कारस्थळी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हासदादा पवार, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, विशाल प्रकाशबापू पाटील, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, धैर्यशील कदम, डॉ. सुरेश जाधव, नितीन भरगुडे पाटील, प्रताप देशमुख, शिवाजीराव महाडीक कुमार बाबर, यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. उदयनराजे भोसले, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार शिवेंद्रराजे भोसले डॉ. प्रियंका शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी भुईंज येथे येवून अंत्यदर्शन घेतले.
मोठा भाऊ गेला, या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण,प्रतापराव भोसले यांनी केले त्यांचे नंतर मला या मतदारसंघात प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मिळाले आदरणीय भाऊंचा व्यासंग खूप मोठा होता,मला वेळोवेळी लाभलेला सहवास व मिळालेली शिकवण मोठा भाऊ म्हणूनचं मिळाली त्यांचेविषयी मी गौरवग्रँथात लिहिलेले आहे त्यांचे संस्कार व यशवंत विचार हे पुढच्या पिढीला नक्कीच ऊर्जा देतील , पालकमंत्री ना,शँभुराज देसाई या जिल्ह्यासाठी व आपल्या माणसासाठी भाऊंनी केलेले कार्य आजही दीपस्तंभा सारखे आहे भाऊंचा प्रशासनावर असणारा वचक व अभ्यास यामुळे राज्यभरात कडक शिस्तबद्ध नेतृत्व म्हणून ओळख आहे त्यांचे जाण्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.
काँग्रेस नेते उल्हासदादा पवार
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे भाऊ अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष असा कार्यकाळ आम्ही राज्यभरात दौरे करून पूर्ण केला,भाऊंची आकलन क्षमता व अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे सभा नेहमीच गाजायच्या त्यांच्या हिंदी मराठी गजल व श्रवण छदं रसिकांच्या क्षेत्रात सर्वश्रुत आहे,
आमदार मकरंद पाटील
आदरणीय भाऊंनी या वाई मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करताना त्यांनी उभी केलेल्या विकासाच्या वाटा सुरू केलेल्या संस्था आदर्शवत आहेत,त्यांनी ग्रामीण विकास मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री या काळातील या जिल्ह्यात झालेल्या कामांची नोंद नक्कीच आदर्शवत आहे असे म्हणून त्यांनी किसनवीर व खंडळा कारखान्याचे तसेच वाई खंडळा महाबळेश्वर या मतदारसंघाचे वतीने श्रद्धांजली वाहिली
विशाल प्रकाशबापू पाटील
आदरणीय भाऊंचे व स्वर्गीय वसंतरावदादा पाटील या घराण्याचे संबध जवळकीचे होते,जेव्हा जेव्हा आमचे कुटुंब अडचणीत सापडले त्यावेळी भाऊंनी स्वतः येऊन आम्हाला संकटातुन बाहेर काढले आहे त्यांनी दिलेले संस्कार व विचार धारा ही ठेव जपुया हीच त्यांना सांगली जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा