सद्गुरू गजानंद माऊलीनी घेतले संत नामदेवाचे दर्शन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली- तालुक्यातील नर्सी नामदेव येथील संत नामदेव मंदिरात श्री सदगुरु गजानंद माऊली यांनी गुरुवारी संत नामदेव महाराज यांचे दर्शन घेऊन आरती केली.
यावेळी संत नामदेव महाराज संस्थानच्या वतीने पुष्पहार व संत नामदेव महाराज यांची मूर्ती देऊन सत्कार केला. श्री क्षेत्र महाकाली संस्थान कासोळा येथे अक्षय तृतीया निमित्त महाकाली यज्ञ व कालभैरव यज्ञाचे निःशुल्क आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सव्वालाख महायज्ञाची पूर्णाहुती होणार आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रण संत नामदेव महाराज संस्थान व भाविक भक्तांना देण्यात आले. यावेळी शिवाजी महाराज राऊत, संभाजी कदम, बळीराम देशमाने, पवन जाधव पाटील, आशिष बडवणे, अजय इंगोले, उत्तम लांभाडे, सुभाष हुले, ज्ञानेश्वर लाड, प्रताप गायकवाड, मुकुंद गायकवाड, जनक गायकवाड, गोपाल गायकवाड, रवि गायकवाड, विश्वनाथ कदम, ताराशींग राठोड, संदेश नागूलकर यांच्या सह भाविक ,भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा