चंद्रकांत खैरे यांना विजयी करण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
संभाजीनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागात फिरून कार्यकर्त्यांनी बैठका सुरू केल्या. सावखेडा, जिरी, बिरोळा, पिंपळगाव, रामवाडी, बळ्हेगाव या गावात जाऊन ग्रामस्थांशी मागील विकासा बाबत झालेली कामे, पुढील ध्येय धोरणे संपूर्ण कार्याचा लेखाजोखा उपस्थित ग्रामस्थासमोर मांडला.
यावेळी उत्तम काका निकम शिवसेना उपजिल्हाप्रमुख, राजेंद्र मगर शिवसेनाप्रमुख, भिकन सोमासे शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा पत्रकार दैनिक सामना, मा उपसरपंच लोणी खुर्द, वाल्मीक पवार, भगवान घोगरे, शिवसेना शाखा प्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथ प्रमुख, युवा सेना शिवसैनिक, तसेच बळेगाव येथील गणेश सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी,गोकुळ सूर्यवंशी,प्रवीण सूर्यवंशी,रामदास सूर्यवंशी,दीपक कुलकर्णी, कचरू सूर्यवंशी, छगन सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा