प्रा.धाराशिव शिराळे यांचे व्याख्यान
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली - माळधामणी येथे महात्मा बसवेश्वर यांची ८९३वी जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त प्रा. धाराशिव शिराळे यांचे विचार प्रबोधन व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी शिराळे यांनी बसव अण्णा यांच्या जीवन चरित्रवार प्रकाश टाकला. यावेळी बोलताना त्यांनी क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान सत्यधर्म ,अहिंसा, नम्रता याबरोबरच मानवाच्या विकासाचा विचार सांगणारे मानवतावादी आहे. समाजातील भोळ्यासमजुती, अंधश्रद्धा, व्यसनधीनता, न्यायनितीचा व्यवहार ,भूतदया, निसर्गप्रेम , स्वकर्तुत्वावर विश्वास, सत्य, अहिंसा, नम्रता याबरोबरच आपण आपल्या सुंदर कार्यातच परमेश्वर शोधावा, कार्य हाच देव मानावा, सर्वाविषयी दया दाखवावी ,स्त्री-पुरुष समानतेचा विचार मानवांच्या मनामनात पेरावा, ज्ञान हेच मानवाचे अभूषण असून दिवस-रात्र कष्ट करत योग्य ज्ञान प्राप्त करावे असा संदेश महात्मा बसवेश्वर यांच्या वचन साहित्यात असून आपण महात्मा बसवेश्वरांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन माळधामणी येथे आयोजित महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त व्याख्यानात संत साहित्याच्या अभ्यासक वक्ते प्रा.धाराशिव शिराळे यांनी केले.
महात्मा बसवेश्वरांनी कन्नड साहित्यात वचन हा काव्यप्रकार रूढ केला असून त्या वचनांच्या माध्यमातून मानवाचा सर्वांगीण विकास त्याच्या नम्र वागण्यात आहे , म्हणून आपण नेहमी नम्रता अंगी असू द्यावी चरित्र संपन्न व्यक्ती हे देशाचे आधारस्तंभ असतात त्या व्यक्तींच्या माध्यमातून देश घडत असतो तेव्हा महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेला विचार जनमानसात रुजवावा आणि आपले जीवन सुंदर संपन्न बनवावे असेही प्रतिपादन प्रा. शिराळे यांनी केले . महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या वचन साहित्यात सांगितले आहे नम्रतेने ,सत्याने इतरांशी वागावे म्हणजे आपण भवसागर तरुण जाऊ. शक्ती, सामर्थ्य ,गुणवत्ता ,बुद्धिमत्ता योग्यता हे गुण प्रत्येकात असतात तेव्हा न्यूनगंड न बाळगता स्वतःचे जीवन प्रकाशमान करावे असा उपदेश त्यांनी लेखन वाणीतून दिला.
यावेळी सरपंच लीलाताई इंगळे, सदस्य मारोतराव इंगळे, प्रा.आशिष इंगळे, प्रा. शिवानंद मेहत्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते गजानन शिंदे यांनी केले तर आभार पत्रकार प्रा.विकास इंगळे यांनी यांनी मानले. जयंती सोहळ्याच्या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे .अध्यक्ष बालाजी बकरे, गोविंद व्यवहारे, संतोष व्यवहारे सदस्य, रंगनाथ व्यवहारे, संतोष पारडकर, संदीप बांगर , तसेच सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा