औंढ्यात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
औंढा नागनाथ - मराठी चित्रपट अभिनेते संदीप पाठक फॅन क्लब च्या वतीने मंगळवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
येथील भक्त निवास क्रमांक एक मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पद्मावती मंदिर मठाचे महंत डॉ. पद्मनाभ गिरी महाराजांच्या हस्ते झाले . प्रथमतः धर्मवीर छञपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. या रक्तदान शिबिरामध्ये ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले .तसेच सर्वात अधीक रक्तदान करणारे अनिल देशमुख , संजय पाटील , बाळू यन्नावार , विक्की खर्जुले, भगवान गोरे , संतोष गोबाडे , दया पवार, डॉ.सीमा देशपांडे, शाम ईघारे , अँड स्वप्नील मुळे ,अंकुश महामुने यांचा ट्राफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी रक्तदान शिबिरास पद् मावती मंदिर मठाचे महंत डॉ.पद्मनाथ गिरी महाराज, दत्त मठाचे महंत श्याम गिरी महाराज, अनिल देशमुख, साहेबराव देशमुख, जया देशमुख, संजय पाटील, मनोज देशमुख, अनिल देव, रिपब्लिकन युवा सेना प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, बंजारा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पंजाब राठोड, नागनाथ संस्थान अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, गार्डप्रमुख बबनराव सोनुने, वैद्यकीय अधिकारी डॉ.तृती वाशिमकर, ग्रामसेवक अनंतराव जाधव, भगवान देशमुख, दत्ता दुडके, तुकाराम भांडे, शाम माने, माधव गोरे, मंजुषा जाधव, प्रणिता महाजन, गजानन देशमुख, शाम इघारे, महेश खुळखुळे आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे आयोजन संदीप पाठक फॅन क्लब औंढा व औंढा अर्बन कॉ- ऑफ क्रेडिट सोसायटी औंढा नागनाथ यांच्या वतीने करण्यात आले होते. रक्तदान शिबिरासाठी गजानन देशमुख, महेश खुळखुळे, दता दुडके, बबन सोनुने, यांनी परिश्रम घेतले. शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय हिंगोली येथील डॉ. श्रद्धा कडू, संतोष सोनटक्के, माधव मोहिते, संतोष ठाकरे, नितीन हाडगे, सुमित मगर, नामदेव चव्हाण यांनी रक्त संकलन केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा