स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोघे ताब्यात
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली शहरात भरदिवसा पिग्मी एजन्टची पैश्याची बॅग व टॅब जबरीने चोरणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली आहे.
शहरात भरदिवसा औंढा रोडवरील ईदगाह मैदान जवळील मस्जीद समोर बंधन बैंक, येथील एक पिग्मी एजन्ट (कॅशीयर) याचे बॅगमधील नगदी १ लाख १२ हजार २५० रूपये व टॅबसह जबरीने चोरी झाल्या संदर्भाने हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तात्काळ छडा लावण्या संदर्भाने शिवसांब घेवारे यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पथकामार्फत सदर गुन्हयाचा समांतर तपास चालु होता.
पोलीस पथक हिंगोली शहर हद्दीत पेट्रोलींग करीत आरोपीची माहीती घेत असतांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सयद अब्बु अली रज्जाक, रा. मस्तानशाहनगर, हिंगोली व परवेज खान युनुस खान पठाण, मस्तानशाहनगर, हिंगोली यांनी एक पिग्मी एजन्ट (कॅशीयर) याच्या बॅगमधील नगदी व साहित्य चोरी केल्याचे खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस पथकाने सदरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन, विश्वासात घेवुन आरोपीतांची गुन्हयासंदर्भाने विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडुन गुन्हयात चोरलेले नगदी एक लाख ,१२ हजार २५० रूपये, एक टेब व गुन्हयात वापरलेली स्कुटी असा एकुण दोन लाख दोन हजार २५० रूपयाचा मुद्देमाल तपासकामी जप्त करून, गुन्हा उघड करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयातील चोरी गेलेला १०० मुद्देमाल रिकव्हर करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार पांडुरंग राठोड, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, किशोर सावंत, महादु शिंदे यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा