पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उचलले पाऊल
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथे पाणी पुरवठा होणाऱ्या वडद येथील तलावाने तळ गाठला असून तसेच विहीर व हातपंपांने देखील तळ गाठल्याने गावात भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. माळसेलू येथील अनिल देशमुख या युवकाने पुढाकार घेत गावात स्वखर्चाने मोफत टँकर ने पाणी पुरवठा सुरू केला, या पाण्यामुळे महिलांची कुठे तरी पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत होणार आहे.
गावात जलजीवन मिशन योजनेचे काम अपूर्ण असल्याने पाणी पोहोचण्यास विलंब होणार आहे, त्यामुळे टँकरचा आधार गावकऱ्यांना होणार आहे. यावेळी गावकऱ्यांनी पाण्यासाठी पुढे आलेल्या युवकांचे आभार मानले यावेळी सरपंच डॉ. भानुदास वामन, नागोराव वामन, दादाराव वामन, माजी सरंपंच कैलास देशमुख, किसन वामन, राजाराम भिसे, विश्वनाथ भिसे, बंडू सोनवणे दत्तराव वामन, दौलत वामन , काशीराम वामन , तात्या, हनुमान गिरी, सदाशिव वामन आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती. अनेक दिवसापासून गावातील कोरड्या ठाक पडलेल्या विहिरीत आज टँकरद्वारे पाणी सोडल्यामुळे कुठे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळाल्याचे चित्र होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा