फेरफार नोंदवण्यासाठी मागितले होते वीस हजार रुपये
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली - सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंदविण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने लाच मागितल्या प्रकरणी गुरुवारी दिनांक ९ रोजी हिंगोली येथील बसस्थानक परिसरात वीस हजारची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून त्याला ताब्यात घेतले.
यामध्ये आरोपी लोकसेवकाने तक्रादारच्या पत्नीच्या नावे असलेली सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंद देउबाई काशीदे यांच्या नावावर न करता तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे कायम ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी डाखोरे यांनी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. त्या लाचेची आज पडताळणी केली असता लाच मागितल्याचे सिद्ध झाले.
दरम्यान, यापूर्वी देखील उत्तम डाखोरे यांच्यावर २०२० मध्ये वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई न करता सोडून दिल्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपयांची लाच स्वीकारली म्हणून कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आता गुरुवारी दुसऱ्यांदा तक्रादार यांच्या कडून वीस हजारची लाच घेताना बसस्थानक परिसरात सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल कटके , पोलीस निरीक्षक विनायक जाधव, तानाजी मुंढे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक ,गजानन पवार , शिवाजी वाघ , यांच्या पथकाने केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा