संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष दिलीप राठोड यांचा उपोषणाचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
लोणार तालुक्यातील सोमठाना- खापरखेड गट ग्रामपंचायतमधील खापरखेड या गावाला पाणीटंचाई निर्माण झाली असताना शासनाने जवळपास 2 ते 3 कोटी रुपयांची जलजीवन योजना मंजूर केली पण संबंधित ठेकेदार थातुर - मातुर काम करून बिले काढण्यात व्यस्त असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे लोणार तालुकाध्यक्ष दिलीप राठोड यांनी केला आहे सदर काम इस्टीमेटप्रमाणे झाले आहे का याची चौकशी करून संबंधित इंजीनियर व ठेकेदार याचे लायसन्स रद्द करून कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा