हिंगोली पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांची संयुक्त कामगिरी
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने तब्बल ४२ गोवंशाची हत्येपासून सुटका केल्याने जीवनदान मिळाले आहे. शहरातील गोदावरी हॉटेलच्या मागच्या परिसरातील ४२ अवैध गोवंशांना हत्येचा उद्देशाने डांबुन ठेवण्यात आले होते, याची माहिती विश्व हिंदू परिषद व पोलीसांना मिळताच अवैध कत्तली पासून जनावरांची सुटका करण्यात आली आहे. शहर पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या नेतृत्वात गोदावरी हॉटेलच्या मागच्या परिसरातील ४२ अवैध गोवंशांची सुटका करण्यात आली.
सदरील गोवंश शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले होते. मात्र पोलिसांनी या पकडलेल्या जनावरांना सध्या गोपाललाल गोशाळा यांच्या स्वाधीन करण्यात केले आहे. जनावरे अतिशय बिकट परिस्थितीतून जात असल्याचे आढळून आले, असून या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे प्रकाश सोनी, गुड्डू घुगे, जतीन साहू, सर्वेश ढोके, ज्ञानु बांगर, बबलू कुरील आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी गोवंशाना गोपाळलाल मंदिर गोशाळा यांच्या स्वाधीन केले आहे. तसेच चारा पाण्याची देखील व्यवस्था केली आहे, रात्री उशिरा पर्यंत गोवंशांचे दाखले तपासणी सुरु होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा