जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा तडाखा
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली - रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली ,तर कळमनुरी येथे गारांचा पाऊस झाला आहे. अन्य ठिकाणी विजेचा कडकडाटासह पाऊस झाला.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजावरून येत्या चार दिवसात राज्यासह काही भागात अवकाळी पावसाचा कहर होईल असा इशारा वेध शाळेने दिला होता .त्यानुसार रविवारी (ता.१२) मे रोजी जिल्हाभरात आस्मानी पावसाने डोके वर काढले अन ठिक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे सर्वत्र बाजारपेठेत एकच धांदल उडाली.
दरम्यान, दिवसभर उन्हाचा तडाखा बसत असताना अंगाची काहिली होत होती. दिवसभर सूर्य आग ओकत असताना सायंकाळी साडे सातच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह , आस्मानी पावसाने विजेच्या विजेच्या कडकडाटा सह पावसाने हजेरी लावली .विजेचा कडकडाट आवाज एवढा जबरदस्त होता की इतर गावात पडली तरी जवळ कुठे तरी पडली असा भास होत होता. आता नेमकी वीज कुठे पडली याची माहिती उद्या सोमवारी मिळेल. मात्र बुलढाणा येथील परंपरागत भेंडवळ मांडणी अक्षय तृतीयेला पार पडली यात त्यांनी खरीप पिकासह अन्य पिके येतील तसेच जून, जुलै, मध्ये कमी प्रमाणात पाऊस तर आगस्ट सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस पडेल असे भाकीत वर्तविले आहे. त्यानंतर पावसाळा संपला तरीही अधून मधून अवकाळी पाऊस पडणार असल्याचे अधोरेखित केले .
दरम्यान, हा पाऊस नांदेड, परभणी, हिंगोली सह मराठवाडा, विदर्भातील अनेक ठिकाणी पडला आहे. जिल्ह्यात कळमनुरी येथे गारपीट झाली, वसमत , सेनगाव , यासह अनेक ठिकाणी विजेचा कडकडाटा सह पावसाने हजेरी लावली. रविवारी अकोला बायपास परिसरात आठवडी बाजार भरला असता पावसाने सुरुवात करताच परिसरातील आलेल्या नागरिकांनी भाजीपाला खरेदी करीत असताना पावसाने हजेरी लावल्याने काही वेळ तारांबळ उडाली होती. भाजी विक्रेत्यांवर ही संकट कोसळले कारण महागाचा भाजीपाला खरेदी करून विक्री करायचा त्यातच पावसाने गहाण केल्याने भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांची फजिती झाली. त्यातच पुन्हा विजेचा लपंडाव सुरू होता.
दरम्यान, तालुक्यातील भांडेगाव येथे रात्री साडेसातच्या सुमारास वीज पडून दोन बैल मृत्युमुखी पडले .तर यात वीज कोसळून तीन व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा