सकल धनगर समाजबांधवाकडुन तहसीलदारांना निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
औंढा नागनाथ - आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर परिसरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा आहे . पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याशेजारी असलेले अतिक्रमण तात्काळ काढा. यासाठी १३ मे रोजी तहसीलदार यांना धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. सदरील निवेदन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी स्वीकारले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य पुर्णाकृती पुतळ्याशेजारील अतिक्रमणामुळे पुतळ्याची शोभा जात आहे. याकडे नागनाथ संस्थानचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांना उत्साह मिळत आहे व अतिक्रमण वाढत चालले आहे. तात्काळ अतिक्रमण धारकावर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा सुद्धा दिसणार नाही. आठ दिवसांमध्ये नागनाथ संस्थांनी लक्ष देऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळील कायमस्वरूपी अतिक्रमण काढून टाकावे व पुतळ्याचे शोभा वाढवावी. आठ दिवसांमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याशेजारी अतिक्रमण काढले नाही तर सकल धनगर समाज बांधवांकडून अतिक्रमण हटवण्यात येईल, यामध्ये काही अनुचित प्रकार घडला तर त्याला नागनाथ संस्थान जबाबदार राहील असा इशारा देखील निवेदनाद्वारे सकल धनगर समाज बांधवांकडून देण्यात आला आहे.
सदरील निवेदनावर शंकरराव हाके, हरिषचंद्र पोले, किरण पोले, नागेश पोले, गोविंद पोले, किरण पोले, संतोष पोले, अभिषेक पोले, संतोष दिंडे ,मंगेश पोले, अजय पोले, राजू पोले, गंगाधर पोले, निळकंठ पोले, लक्ष्मण हराळ, लखन खटके, बाळू जवादे, विकास चव्हाण, विष्णू खटके, आकाश चव्हाण, विकास बामणे, यांच्यासह सकल धनगर समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा