ओमकार पतंगे व आरती चव्हाण रांगोळी या कलाकारांचे होत आहे कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
आखाडा बाळापूर - येथून जवळच असलेल्या काडली येथे मागील सहा दिवसापासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा कीर्तनकाराचे कीर्तन रुपी सेवा आयोजित करण्यात आली आहे. तर भागवताचार्य म्हणून हभप नामदेव महाराज काकडे वाशिमकर हे मधुर वाणीतून भागवत करीत आहेत. या ठिकाणी गावातील युवा तरुणांच्याच्या वतीने दररोजच्या भागवत कथेमधील घटनेवर आधारित रांगोळी काढण्यात येत आहे. आज सहाव्या दिवशी भागवत कथेमध्ये श्रीकृष्ण यांचा विवाह सोहळा असतो त्यानिमित्त त्यांनी श्रीकृष्ण व राधा यांच्या गळ्यामध्ये माळा घातलेली रांगोळी साकारली होती. ही रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरत होती. येथील ओमकार पतंगे व आरती चव्हाण या दोघांनी ही रांगोळी काढली होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा