दैवज्ञ सोनार समाज मंडळातर्फे दोघांचेही कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली येथील दैवज्ञ सोनार समाज मंडळातर्फे अविनाश म्हेत्रे यांना गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्या बद्दल तर एसआरपीएफ मध्ये कार्येरत असलेले सतीश नंदनकर यांना पदोन्नती मिळाल्या बदल त्यांचा रविवारी विवेकानंद नगर येथील दत्त मंदिराच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.
यावेळी मधूकरराव थोरकर, भागवत नंदनकर, अशोक अर्धापुरकर, दतात्रय मेहत्रे, बी. आर. लिंबेकर, राजेश दारव्हेकर, राम दुडके, सतीश घोडके, बाळु रत्नपारखी, दशरथ केजकर, विपीन अर्धापुरकर, सुवर्णकार आदींची उपस्थिती होती.
हिंगोली येथील वीज महावितरण कंपनीत कार्यरत असलेले अविनाश म्हेत्रे यांना महाराष्ट्र दिनी गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच येथील राज्य राखीव पोलिस गट क्रमांक १२ मध्ये एसआरपीएफ कँम्प मधील सतीश नंदनकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. नंदनकर यांनी आतापर्यंत एसआरपीएफ मध्ये कार्यरत असताना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात प्रास्ताविक अशोक अर्धापुरकर यांनी केले. सुत्रसंचालन राम दुडके यांनी तर दतात्रय मेहत्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी दैवज्ञ सोनार समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा