भगवान परशुरामांच्या मूर्तीचे पूजन करून शहरातून काढली भव्य शोभायात्रा
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी न्यूज चंद्रकांत)
शहरातील गायत्री मंगल कार्यालयात भगवान परशुराम जयंती निमित्ताने पुतळ्याचे पुजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. या कार्यक्रमात सकल ब्राम्हण समाजाचे गोविंद खंडेलवाल पहेलवान, डॉ. संजय नाकाडे, डॉ. आशुुतोष माहुरकर , अशोक शर्मा, संजय मानका, अनिल शर्मा, धीरज शर्मा, प्रकाश शर्मा, शिवप्रसाद जोशी, आशीष शर्मा, पिंटू शर्मा, प्रदीप उपाध्याय, गणेश पहीनकर, सुधीर गोगटे , जुगल खंडेलवाल, अभय जोशी, दत्तराज डोईफोडे, श्याम खंडेलवाल, राघव खंडेलवाल, गोपाल शर्मा, कृष्णा शर्मा, विनायक जोशी, प्रेम शर्मा, योगेश पांडे, हर्ष शर्मा, लखन पंडित, अनिल शर्मा यासह सकल ब्राम्हण समाजातील अनेकांची उपस्थिती होती.
१६ मे गुरूवार रोजी हिंगोली शहरातील मंगळवारा भागातील श्री दत्त मंदिरातुन भगवान परशुराम जयंती निमित्ताने भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. ही शोभा यात्रा देवगल्ली, मारवाडी गल्ली, कपडा गल्ली, महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, पोस्ट ऑफिस रस्त्यावरून रेल्वे स्टेशन रस्त्यावरील गायत्री मंगल कार्यालयात विर्सजित होणार आहे. या ठिकाणी पुजन, आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. शोभायात्रा व कार्यक्रमात सकल ब्राम्हण समाजाने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा