महावितरण च्या तारांच्या शॉर्ट सर्किटने लागली आग
शिवशाही वृत्तसेवा, छत्रपती संभाजी नगर, कन्नड जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे
कन्नड तालुक्यातील कोळंबी मंजरा (ता.कन्नड) येथील शेतकरी सुमनबाई भाऊसाहेब जाधव यांच्या गट नंबर १०० मधील ऊस शॉर्ट सर्किट मुळे आग लागून खाक झाला. आज दुपारी ही घटना घडली. शेत मालक व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत जवळपास अर्धा एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील पन्नास हजार रुपयांचा ऊस जळून खाक झाला. शेतातील वीज महामंडळाच्या विजवाहक तारांचे घर्षण होऊन त्याच्या ठिणग्या उसाच्या शेतात पडल्याने ही घटना घडली.
जाधव यांच्या शेताशेजारी असलेल्या अर्जुन देहाडे या शेतकऱ्याचे पत्र्याचे शेड, वीस खतांच्या गोण्या, दहा गव्हाच्या गोण्या, ठिबक नळ्या व इतर शेतीउपयोगी साहित्य असे एकूण ऐंशी हजार रुपयांचे साहित्य सुद्धा यात जळून खाक झाले. गुरुवारी तलाठी भिवसने व राजू खडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचांसमक्ष झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यास वीज मंडळाकडून व शासनाकडून तात्काळ नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा