विठ्ठल शेळके यांना पुरस्कार आल्यामुळे तहसील कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
औंढा नागनाथ - महाराष्ट्र दिनानिमित्ताने दरवर्षी जिल्हास्तरीय आदर्श तलाठी हा पुरस्कार जिल्हास्तरावरून दिल्या जातो .यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श तलाठी पुरस्कार हा औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथील तलाठी विठ्ठल शेळके यांना मिळाला आहे .
यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श तलाठी पुरस्कार विठ्ठल शेळके यांना १ मे महाराष्ट्र दिनी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे .यामध्ये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र यासह पाच हजार रोख रक्कम हे पुरस्काराचे स्वरूप होते.
जिल्हास्तरीय आदर्श तलाठी पुरस्कार विठ्ठल शेळके यांना मिळाल्याने औंढा नागनाथ तहसील कार्यालयामध्ये तलाठी विठ्ठल शेळके यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. औंढा तहसीलदार हरीश गाडे यांनी जिल्हास्तरीय आदर्श तलाठी पुरस्कार विठ्ठल शेळके यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .तसेच तलाठी व मंडळ अधिकाऱ्याने देखील यांचा सत्कार केला. सत्कार कार्यक्रमास नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव ,नायब तहसीलदार लता लाखाडे , संजय पाटील ,सचिन क्षिरसागर, नितीश कुलकर्णी , शरद नाईकनवरे, मंडळ अधिकारी रंगनाथ म्हेञे, सुरेश बोबडे, प्रभाकर काळे ,उत्तम डाखोरे, आशा गीते ,अर्चना पटवे ,सुजाता गायकवाड, गोपाल मुकीर ,सुनील रोडगे, गजानन हजारे ,अंकुश मुंढे , गजानन गुंजकर, संजय पाटील, लता बोडखे , पुष्पलता जायभाये ,नंदा डाके, ज्योती स्वामी, रूपा कळसकर, सुवर्णमाला सिरसाट , वैशाली सावते , माधव भुसावळे , बालासाहेब बेले, माधव पोफसे , संजय वाघिले , सचिन जोंधळे , डिगांबर बांगर , नरहरी मुंढे यांच्यासह तलाठी व मंडळ अधिकारी कोतवाल यांच्यासह तहसीलमधील कर्मचारी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा