अतिक्रमण हटविल्याने रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - शहरातील काही भागात रस्त्याचे कामे केली जात असल्याने अतिक्रमण समोर येत आहे. त्यामुळे पालिकेने अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या असताना काहींनी अतिक्रमण काढून घेतले तर काही अतिक्रमण जेसीबीच्या साहयाने पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. त्यामुळे अरुंद रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
नुकतेच २६ एप्रिल रोजी लोकसभेचे मतदान प्रक्रिया पार पडली , पालिकेने अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्यासाठी सूचना दिल्या होत्या की नव्हत्या काही नागरिकांना माहिती नव्हते ,अचानक अतिक्रमण मोहीम कशी काय पालिकेला आठवली काही कळायला मार्ग नाही. लोकसभा निवडणुकीचा वचपा तर नव्हे असा ही नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. अद्याप आचारसंहिता लागू आहे , आचारसंहिता संपली नसल्याने पालिका कसे काय निर्णय घेते असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गुरुवारी नगरपालिकेने अचानक अतिक्रमण मोहीम हाती घेतली यात शहरातील फुलमंडी , इंदिरा चौक ,हरण चौक, मच्छी मार्केट , आदी ठिकाणाहून १५० पेक्षा अतिक्रमण पहिल्याच दिवशी हटविल्याने अरुंद रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला .काही अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन अतिक्रमणे हटविली तर काही अतिक्रमणे स्वतः हुन मालकांनी काढली नसल्याने पालिकेच्या जेसीबीच्या साह्याने काढण्यात आली .काही व्यापाऱ्यांनी स्वतः हुन अतिक्रमण काढून घेतले. पालिकेने सर्व सामान्यांचे अतिक्रमण तर काढले बड्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण का काढले जात नाही असा सवाल काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. पहिल्याच दिवशी १५० पेक्षा अधिक अतिक्रमण काढल्याने अरुंद रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
ही अतिक्रमण मोहीम मुख्याधिकारी अरविंद मुंढे , उपमुख्याधिकारी हेंबाडे , यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता रत्नाकर अडशीरे , बाळू बांगर ,मस्के, यांच्यासह पालिकेचे कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा