३ जन गंभीर जखमी, गिलोरी पाटीच्या वळण रस्त्यावर घडली घटना
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
सेनगाव(̊ ) भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात एक महिला व एक पुरुष असे दोघेजण जागीच ठार झाले तर नांदेड येथे गंभीर जखमींना हलविल्या नंतर एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाल्याची घटना सेनगाव ते नरसी नामदेव मार्गावरील गिलोरी पाटीजवळ दिनांक ४ मे शनिवार रोजी पहाटे चार वाजता हा अपघात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमरखेड तालुक्यातील खरुज येथील वानखेडे कुटुंबीय त्यांच्या कारणे छत्रपती संभाजी नगर येथे रुग्णालयात औषध उपचारासाठी गेले होते. रात्रीच्या सुमारास ते परत गावाकडे येत असताना त्यांची भरधाव कार शनिवार पहाटे चार वाजताच्या सुमारास सेनगाव ते नरसी नामदेव मार्गावरील गिलोरी पाटी जवळील वळण रस्त्यावर आली असता चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या खाली असलेल्या एका झाडावर आदळली. यावेळी मोठा आवाज झाल्याने गावकरी घटनास्थळी धावले या घटनेची माहिती मिळताच नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, जमादार पांडुरंग डवले, हेमत दराडे,प्रभाकर माने,पाचपुते, यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता अनिरुद्ध तानाजी वानखेडे वय २८ व अर्चना सुभाष वानखेडे व ३७ राहणार खरूज तालुका उमरखेड यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले.
याशिवाय सुभाष रामराव वानखेडे, संतोष कैलास वानखेडे, अनंता गंगाराम चव्हाण, हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे दरम्यान उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आलेल्या तिघांपैकी आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र मयताचे नाव समजू शकले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.या प्रकरणी नरसी नामदेव पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा