बैठकीला पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर तालुका प्रतिनिधी, अनिल सूर्यवंशी
शिवसेना -भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेस- मनसे- आरपीआय -रासप- पीपल्स रिपब्लिकन पक्ष- प्रहार संघटना महायुतीचे छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिपान भुमरे साहेब यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल जी सत्तार साहेब व महायुतीचे सर्व पदाधिकारी यांनी यांनी वैजापूर तालुक्यातील लासुरगाव खंडाळा, शिऊर,लाडगाव,सावखेड गंगा, बाबुळगाव गंगा, नांदूर ढोक, कापूस वाडगाव प्रचार बैठका घेतल्या.
मंत्री महोदय व आमदार साहेबांनी ग्रामस्थांशी विकासाबाबत चर्चा करून संवाद साधला आणि येणाऱ्या 13 मे रोजी धनुष्यबाणाला मतदान करून लोकप्रिय उमेदवार संदिपान भुमरे साहेब यांना बहुमताने विजयी करा असे आव्हान केले.
या बैठकीला तालुक्यातील सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी ग्रामस्थ शेतकरी नवयुवक पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा