maharashtra day, workers day, shivshahi news,

पाक धार्जिन्या शकिलने देश विघातक कृत्य केलेला मोबाईल फोडला

मोबाईलच्या शोध व चौकशी  साठी सुरत पोलीस पुन्हा नरसीत
Islamic Terrorism, Sheikh Shakeel Sheikh Satar, Narsi, Naigaon, Nanded, Surat Police

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
नरसी येथे मजीद जवळ मूखेड रोडवर मेहबूब नगर आहे तेथे राहणाऱ्या शेतकरी कुटुंबात शकील सत्तार शेख राहत असे तो नेहमी समाजा पासून अलिप्त राहून काहीतरी वेगळे समाज विघातक कार्य करत असल्याचे काही लोकांच्या लक्षात आले होते. अशा लोकांनी ही बाब त्याच्या वडिलांच्या कानावर  टाकली होती, पण याकडे वडिलांनी दुर्लक्ष केले.  पाकिस्तानच्या  व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये शकील याची चॅटिंग झाल्याचेही आढळून आले या आरोपींच्या व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये अनेक समाज विघातक बाबी समोर आल्याने गुजरात राज्यातील सुरत एटीएसने शकिलला ताब्यात घेऊन  नरसीत शकिल हा एकटाच आहे की त्याचे ब्रेनवाश करणारे आणखीन कोणकोण आहेत याचा पोलीस यंत्रणा माग काढत आहे.
नायगाव - पाकिस्तानी हॉट्सॲप ग्रुपशी कनेक्शन असलेल्या व गुजरात बटीएसने अटक केलेल्या नरसी येथील शेख शकील शेख सतार याने फोडलेला मोबाईल शोधण्यासाठी सुरतचे पोलिस आठ दिवसानंतर त्याला घेवून  नरसी येथे दाखल झाले. परंतु त्याचा मोबाईलचा शोध न लागल्याने संशय बळावला असून त्याचे आई-वडील नरसी सोडून दूसरीकडे राहायला गेले.त्यांचा शोध घेऊन सखोल चौकशी करूनच पोलीस रवाना झाल्याने या प्रकरणाचे धागदोरे वाढताना दिसून येत आहेत.
या बाबत अधिक वृत्त असे की, पाकिस्तानी व्हॉट्सॲप ग्रुपच्या सानिध्यात राहून देश विघातक कारवायां बरोबरच नामांकित पत्रकार मान्यवर नेत्यांची हत्या व शस्त्रे खरेदी याबाबत कट कारस्थान रचण्याच्या आरोपावरुन नायगाव तालुक्यातील नरसी येथील शेख शकील या तरुणास गुजरात एटीएसने आठ दिवसांपूर्वीच अटक केली आहे. 

या घटनेने नायगाव नरसी सह नांदेड जिल्ह्यात  चांगलीच खळबळ उडाली होती.आपले बिंग फुटले याची कुणकुण लागल्याने शकिलने आपला मोबाईल फोडून टाकला होता. तो मोबाईल कुठे फेकला याचा शोध घेण्यासाठी सुरतचे पोलीस त्याला घेवून पुनः नरसीत दाखल झाले होते. 
मुलाने केलेल्या गैर कृत्याची ठोकर मनाला पोहचल्याने शकिलचे आई-वडील यांनी नरसी चया मजिदी जवळील घराला कुलूप लावून बाहेर म्हणजे शकीलच्या आजोळी कुंचेली येथे रहावयास गेले होते .चौकशीत हे कळाल्याने सुरत पोलीसांचे पथक कुंचेली ता नायगाव  येथेही चौकशी कामी गेले होते. 

त्या ठिकाणी शकिलने फोडलेला मोबाईल कुठे लपवून ठेवला याचा शोध त्याच्या घरासोबतच शेतातही घेतला. तो सापडला किंवा नाही या बाबत या तपास करणाऱ्या पथकाने गुप्तता पाळत काहीही माहिती दिली नाही.
शकिल हा पाकिस्तानी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देश विरोधी कारवायांच्या सोबतच नामांकित पत्रकार व मान्यवर नेत्यांची हत्या व शस्त्रे खरेदी बाबत कारस्थान रचत असलेले उघडकीस झाल्याने दि.१२ मे रोजी गुजरात एटीएसने त्याला अटक केली होती. त्याला सुरतला नेल्यानंतर सुरत पोलीस पुढील तपासासाठीत्याला घेवून शनिवारी परत नरसीत दाखल झाले. यामुळे नरसी व नायगाव तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. 
तो वापरत असलेला मोबाईल फोडूनटाकल्याचे त्याने तपास यंत्रणेला सांगितले, पण तो कुठे लपवला याचा तो थांगपत्ता लागू देत नव्हता. म्हणून सुरत पोलीस शकीलला घेवून पुनः नरसीत दाखल झाले. त्याने फोडलेल्या मोबाईलचा शोध घेतला जात आहे. या मोबाईल मध्ये काय काय दडले आहे हे उघड करण्यासाठी सुरत पोलीस शोधमोहीम व चौकशी यंत्रणा राबवत आहेत. 
शंकर नगर पोलीस सूत्रांकडून मिळलेल्या माहिती प्रमाणे घटना घडल्या पासून गावात नरसी येथे न राहणारे शकील चे आई वडील शकील च्या आजोळी म्हणजे नरसी पासून पाच सात की.मी.अंतरावरील कुंचेली येथे राहत होते. तेथे त्यांची पोलिसांसोबत भेट झाली असे पोलीस सूत्रांनी सांगितले.तर गावातील इतरांकडून माहिती काढली असता पोलीस येण्याची खबर लागताच आई व वडील गावातून निघून गेली व सुरत पोलिसांनी आजी  आजोबाची सखोल चौकशी केलीअसे कळले या बाबद सर्व तपास गुप्त राखल्या जात असल्याने अधिकृत माहिती मिळणे आवघड जात आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !