पंचवीस वर्षाची रस्त्यासाठीची प्रतीक्षा संपली
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत मौजे सालेगाव, डोंगरगांव, या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देगलूर च्या वतीने डोंगरगाव ते दुगाव फाटा ते सालेगाव पर्यंत होणारा डांबरीकरण व मजबुतीकरण रस्त्याच्या कामासाठी सहा कोटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर कामाला सुरुवात झाली आहे.
साडेपाच मीटर डांबर पट्टी व 15 मीटर मजबुतीकरण रस्ता बनवण्यासाठी गुत्तेदार यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे हा रस्ता पावसाळ्यापूर्वी होईल का अशी उत्सुकता नागरिकांना आहे . पंचवीस वर्षापासून दुगाव फाटा, डोंगरगाव व सालेगाव रस्त्याचे अत्यंत दुरावस्था झाल्या असून झाडे झुडपे व मोठे मोठे खड्डे त्यातही रस्ता नीट नाही अशा अवस्थेत पंचवीस वर्षे पासून ह्या रस्त्यावरील नागरिक मात्र हैराण झाले होते. पंचवीस वर्षाच्या नंतर ह्या रस्त्याची प्रत्यक्ष संपली असे डोंगरगाव येथील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते बालाजी नारे देवराव नारे यांनी सांगितले.
सदर रस्ता हा मजबुतीकरण करून जाडी, झुडपे तोडून नाली बांधकाम करण्यात तसेच डांबरपट्टी हे साडेपाच मीटर 18 फूट व दोन्ही साईट पट्ट्या पाच पाच असे एकूण रुंदी साडे पंधरा मीटर व लांबी साडेतीन किलोमीटर असा हा रस्ता मजबूती करणे साठी सुरुवात करण्यात आला आहे . त्यामुळे डोंगरगाव सालेगाव व दुगाव कडे जाणाऱ्या नागरिक समाधान व्यक्त करण्यात येत असून सदर रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे करण्यात यावी अशी मागणी हे नागरिकांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा