तहसील अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे वाळू तस्करांना अभय
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
कळमनुरी - शहरासह तालुका अवैध वाळू तस्कर सक्रिय झाले असुन रात्रभर चालतोय अवैध वाळू तस्करीचा गोरख धंदा दररोज रात्रीच्या वेळेला अनेक वाळू ने भरलेले ट्रेक्टर, टिप्पर शहरात दाखल होतात दिवस निघताच रस्त्यावर गल्ली बोळात अनेक वाळूचे ढिगारे दिसून येतात रात्र झाली की वाळू तस्कर सक्रीय होतात.
दिवसभर विश्रांती घेऊन वाळू तस्कर रात्रीच्या वेळेला सक्रिय होतात आणि मग सुरू होतो वाळूचा धंदा रात्रभर वाळुने भरलेली अनेक वाहने हजारो ब्रास वाळू घेऊन शहरात तालुक्याभरात वाळू ऑर्डर प्रमाणे टाकतात तहसील अधिकाऱ्यांशी संगणमत करून वाळू तस्कर वर्षाकाठी लाखो रुपयांचा महसूल बुडवून शासनाला चुना लावण्याचा काम करतात अनेक वेळा वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या आहेत तर काही महिन्या पूर्वी सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी यांनी आवाज उठवून सुद्धा भ्रष्ट झालेल्या प्रशासनावर कोणत्याही परिणाम होताना दिसून आला नाही. कार्यवाहीच्या नावाखाली एखाद्या वाळूचा ट्रॅक्टर वर नाममात्र कार्यवाही करून सोडून दिले जाते वाळू तस्करीचे जाळे संपूर्ण शहरासह तालुक्यात पसरलेले आहे. वाळू तस्करीत सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे .अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वाळू तस्करीत वाळू तस्करी करून धन दांडगे बनले आहे पण वाळू तस्करावर कार्यवाही होताना दिसून येत नाही.
गेल्या अनेक दिवसापासून रात्रभर चालणाऱ्या वाळू तस्करीचा धंदा रात्रीचा गस्तीवर असलेल्या पोलिसांचा कसा निदर्शनास येत नसावा आश्चर्याची बाब आहे. रात्री बेरात्री, चोरट्या मार्गाने कोंढूर, सोडेगांव येथून येणारी वाळूची वाहने पोलिसांना दिसत नाही का? पोलिसांना कडून कोणतेही वाळूचे वाहने पकडून कारवाई होताना दिसून येत नाही हे विशेष शहरात व तालुक्यात होत असलेले अवैध वाळूच्या तस्करिवर तहसील अधिकारी व पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा