maharashtra day, workers day, shivshahi news,

आंबा व्यापारी हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी आले आणि तीन लाख रुपये असलेली बॅग विसरून पुढे गेले - त्यानंतर जे घडले ते आश्चर्यजनकच

हॉटेल चालकाने परत केली ३ लाखांची रोकड - नितीन डेरे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव
3 lakh cash returned, hotel vishal, nitin dere, yele, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वेळे ता.वाई येथील रहिवासी असलेले  नितीन शेठ डेरे  यांच्या वेळे येथील हॉटेल विशाल या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता आंबा व्यापारी  दिनेश देसाई हे पुण्यावरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल विशाल येथे नाश्त्यासाठी थांबले होते व नाश्ता झाल्या नंतर त्यांच्या जवळ रोख रक्कम 3 लाख रुपये असलेली बॅग ते हॉटेल मध्येच  विसरून गेले कराड येथे पोहोचल्या वर आपल्या सोबत असणारी पैशाची बॅग हॉटेल मध्येच विसरल्याचे  त्यांच्या हि गोष्ट लक्षात आली. हि बॅग कस्टमर विसरुन गेले आहे हे हॉटेल मालक नितीनशेठ डेरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ती उघडुन न पाहता  ताब्यात घेवुन स्वताच्या लॉकर मध्येच सुरक्षित ठेवली होती. त्यानंतर काही तासातच हे आंबा व्यापारी कराड वरुन परत वेळे येथील विशाल हॉटेल मध्ये आले. आंबा व्यापारी  देसाई आल्या नंतर त्यांची शहानिशा करून  नितीन डेरे यांनी रोख रक्कम 3 लाख रुपये असलेली बॅग त्यांना परत केली. 
हॉटेल मालक नितीन डेरे यांचा हा प्रामाणिक पणा पाहुन आंबा व्यापारी देसाई यांनी त्यांचे कौतुक करुन मनःपूर्वक आभार मानले आणि आजच्या युगात असेही प्रामाणिक लोक आहेत याबद्दल त्यांनी आभार मानले व त्यांना रोख रक्कम बक्षीस देऊ करत होते परंतु नितीन शेठ यांनी त्यांना नम्रपणे नकार दिला नितीन डेरे यांच्या या प्रामाणिक पणाचे वेळे गावासह सर्व स्तरातून कौतुकांचा आणी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !