मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी केले मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली - सेवासदन परिवाराच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संस्कार शिबिरातील मुलांची आरोग्य तपासणी जिल्हा आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉ. नितीन तडस, डॉ. विठ्ठल रोडगे, डॉ. अमोल देशमुख, डॉ. जगन्नाथ जारे, डॉ. आयोध्या जारे, डॉ. आदर्श घनसावंत, डॉ. मिलिंद अंभोरे, तसेच सिविल हॉस्पिटलच्या पथकाने संस्कार शिबिरातील मुलांची आरोग्य तपासणी केली. तसेच डॉक्टर नितीन तडस यांनी संस्कार शिबिरातील मुलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेतल्या. मुलांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी मार्गदर्शन केले. गरज असलेल्या विद्यार्थ्यांना औषधोपचार देण्यात आले.
यावेळी शिवाजी कऱ्हाळे, विलास कोल्हाळ, अमर साखरे, अमर गायकवाड, गौरव गणगे, साक्षी गणगे, वंदना हटकर, आदी उपस्थित होते. संस्कार शिबिराचे आयोजक धनराज कदम व मीरा कदम यांनी आरोग्य पथकाचे आभार मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा