maharashtra day, workers day, shivshahi news,

मंगळवेढ्यातील गोणेवाडीचे आदर्श दिव्यांग मतदान केंद्र ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू

प्रशासनाबरोबरच सर्वसामान्य मतदारांनीही केले कौतुक
Ideal Disability Polling Station, gonewadi, mangalwedha, solapur, election, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर 
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक विभागाच्यावतीने सखी मतदान केंद्र, आदर्श दिव्यांग मतदान केंद्र, आदर्श महिला मतदान केंद्र, आदर्श युवा मतदान केंद्र याचबरोबर आदर्श मतदान केंद्र ही संकल्पना राबविल्यामुळे मतदार आकर्षित होऊन  मतदानाचा हक्क बजाविला आहे. 42 सोलापूर लोकसभा मतदार संघातील  पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील दिव्यांग मतदारांसाठी स्थापन केलेले आदर्श दिव्यांग मतदान केंद्र हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.
जिल्ह्यात  सोलापूर-42 (अ.जा.) व माढा-43 लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवार दिनांक- 07 मे 2024 रोजी मतदान पार पडले. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 337 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी मदन जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी जगन्नाथ गारूळे यांनी मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील आदर्श दिव्यांग मतदान केंद्राची स्थापना केली. या मतदान केंद्रात रॅम्प, व्हीलचेअर, प्रथमोपचार पेटी, मदत कक्ष, कमोडसह स्वतंत्र प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष, उष्मघातापासून वाचण्यासाठी सूचना फलक, आरोग्य सुविधा,पुरेशी प्रकाश व्यवथा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, महिला दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी महिला स्वयंसेवक, कुलर इत्यादी आवश्यक सुविधा देण्यात आल्या. गोणेवाडी येथील आदर्श दिव्यांग मतदान केंद्र स्थापनेसाठी ग्रामसेवक बंडोपंत काटे, पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !