वाई परिसरात शोककळा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहरातील रहिवासी असलेले आणी वाई तालुका सेवानिवृत्त महसूल अधिकारी/कर्मचारी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश महादेव दगडे, निवृत्त नायब तहसीलदार यांचे बुधवार दि.८रोजी रात्री ९=३० च्या दरम्यान सातारा हॉस्पिटल, सातारा येथे दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी व एक अविवाहित मुलगा आहे . गेले दोन महिने ते कावीळ या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या अचानक निधनाने सर्व थरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे .
गुरुवारी सकाळी ९=३० वाजता वाई येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कार समयी सामाजिक शैक्षणीक सहकार राजकीय महसुल विभागातील मान्यवर उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा