maharashtra day, workers day, shivshahi news,

आम्हाला राशन द्या तरच मतदान करणार

राजापूर गावातील नागरिकांचा आक्रमक पवित्रा 
Will vote only if you give us ration , Rajapur , Hingoli , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
औंढा नागनाथ - तालुक्यातील राजापूर गावात रास्तभाव दुकानदाराचा मार्च चा माल वाटप न करता परस्पर काळ्या  बाजारात विक्री केल्यानेगावातील नागरिकांना माल मिळाला नाही, त्यामुळे माल मिळाला तरच मतदान करणार असल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
 तहसील कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले की, राजापूर येथील रा.भा. दुकानचा मार्चचा माल वाटप न करता परस्पर काळया बाजारात विक्री केला गेला .सर्व गावकरी खालील मुदया नुसार तक्रार देत आहोत. जानेवारी ला राजापूर येथील रास्तभाव दुकानदार याना दुकानचा परवाना नुतनीकरण मिळाला होता. त्यांनी जानेवारीला मालाची उचल करुन जानेवारी ला मालाची वाटप केली नाही ती वाटप फेब्रुवारी ला वाटप केली. फेब्रुवारीला आनंदाचा शिधा वाटप केला व त्या सोबत मालाची सुध्दा पावती काढली व माल वाटप केला.मार्च ला माल येणार म्हणुन पुन्हा मार्च मध्ये ४०टक्के कार्ड धारकाच्या पावत्या काढल्या आहेत परंतु मार्च चा माल गावात न आनता परस्पर काळया बाजारात विकला. 
राजापूर या अगोदर रा.भा. दुकान निलंबीत होण्याचे कारण त्यानी सहा महिण्याचा माल परस्पर विक्री केल्यामुळे त्याचे परवाना कायमचा निलंबीत केला होता.परंतु परत दुकान मंजुर करुन आनले व तीन महिण्यात दोन महिने वाटप केले व एक महिणा माल वाटपच केला नाही. आन्नसुरक्षा योजना ही गरीब व आंदोत्य गरीब कार्ड धारकाना उपाशी पोटी राहु नये म्हणून सरकारने सुरु केली आहे. आज रोजी ७० टक्के। कार्ड धारकाचा उदरनिर्वाह हया मालावर चालतो परंतु आज कार्ड धारक उपाशी राहण्याची वेळ आली याला जिम्मेदार कोण? स्वतः दुकानदाराला पॅरेलेस झालेला आहे तो गेल्या पाच वर्षा पासुन स्वतः काम निट करु शकत नाही व त्याचे दोन मुले पुतण्या कंपनीत काम करतात ते सुध्दा गावात राहात नाहीत. मशिनची लॉगीन तिसऱ्या व्यक्तीस दिली आहे तो सुध्दा ग्रामपंचायतचा ऑपरेटर आहे तो सुध्दा गरीब कार्ड धारकावर वर्चस्व गाजवतो. 
तसेच एक तीसरा दुकानदार आहे त्याच्याकडे औंढा (ना.) चे दोन व धारखेडा. सुरेगाव, साळणा आसे एकुण पाच दुकाने चालवतो व पुन्हा राजापुर सुध्दा चालवत आहे. तसेच गरीब कार्ड धारकास नेमका दुकानदार कोण आहे हे समजत नाही हया दुकानदारास फोन केला तर तो म्हणतो मी मार्च चा राजापुरचा माल विकला आहे. तुम्ही माझे काही वाकडे करु शकत नाही तहसिलदार, कलेक्टर माझ्या मुठ्ठीत आहेत तुम्ही कोणालाही आर्ज दया.
पाच ते सहा दुकान चालवणारा दुकानदार यानी मार्चच्या मालाचे आपहरण केले आहे गरीब कार्ड धारकाच्या आन्नाचा घास हिसकावून घेवुन स्वतः लाभ घेतला आहे या दुकानदारावर योग्य ती कार्यवाही करुन गरीब कार्ड धारकाची सुटका करुन न्याय दयावा कारण गरीब कार्ड धारक हया लोकाच्या विरोध करु शकत नाहीत. फक्त तहसिलदार साहेब गरीब कार्ड धारकाना माल मिळवून देऊ शकतात.
आता तीन महिण्याचा एक महिना गायब केला तर बारा महिण्यात ८ महिणे वाटप करुन ४ महिणे राशन दुकानदार गरीबाचा शिधा खाणार तर आन्न सुरक्षा योजना कोणासाठी ,
जानेवारीची वाटप हि फेब्रुवारी मध्ये केली तीही एकच दिवस १० ते ४ वाजे पर्यत बरेच कार्ड धारक शेतात जातात तेही माला पासुन वंचीत राहिले आणि फेब्रुवारी मध्ये किट वाटप सुध्दा एकच दिवस केली मागील तीन महिण्याचे ऑक्टोबर २०२३ ते डिसेबर २३ वाटप बघीतले तर७० ते ८० टक्के  वाटप झाली आहे व जानेवारी फेब्रुवारी वाटप हे ४०टक्के ते ५०  च्या आत वाटप आहे यावरुन आसे समजते की दुकान हे कार्ड धारकासाठी नाही ते दुकानदारासाठी आहे.
तर तहसिलदारांनी सर्व कार्ड धारकास याच्या पासुन वाचवावे नसता  राजापुर गावातील  सर्व कार्डधारक १ मे च्या दिवशी तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण करावे लागेल तरी तहसिलदारांनी त्वरीत अर्जाचा गाभीर्याने विचार करुन आम्हा सर्व कार्डधारकाना न्याय द्यावा .
सदरील निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य आम्रपाली गायकवाड , संभाजी पोले, जगन्नाथ गायकवाड ,केवळाजी गायकवाड,  संजय शिंदे, हनुमंतराव पोले, भीमराव खंदारे , सटवाजी पोले ,साहेबराव पोले , जयवंतराव दिंडे, बापूराव पोले, संतोष चिरमाडे, नागोराव पोले, देविदास चिरमाडे, शिवाजी दिंडे, बालाजी पोले, गजानन पोले, विठ्ठल पोले , संभाराव दिंडे, बालाजी साबळे, रमेश दिंडे, तुकाराम चिरमाडे , बंडू ढेंबरे , रामराव पोले,  शंकर पोले, उत्तम चिरमाडे,  सखाराम चिरमाडे,  विठ्ठल चिरमाडे , यांच्यासह ४० ग्रामस्थांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !