नरसी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचंड जाहीर सभा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर)
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली समग्र, समृद्ध, विकसित, मजबूत भारत बनवण्या साठी महायुतीच्या उमेदवारांना मत द्या. याचे साक्षीदार होण्यासाठी नांदेड लोकसभेचे युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर याना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नायगाव तालुक्यातील नरसी येथील जाहीर सभेत उपस्थितीत जन समुदायाला बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले कृषी मंत्री शरद पवारांनी महाराष्ट्रात जेवढा विकास केला नाही त्याच्या तिप्पट विकास मोदी सरकारने दहा वर्षात केला. याची आकडेवारी जनते समोर मांडून महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची उजळणी मांडली.
370 कलम रद्द करणे व राम मंदिर प्रश्नाला प्रलंबित ठेवत काँग्रेस ने स्वार्थी राजकारण केले ते मोदी सरकारने पूर्ण दोन्ही यशस्वी रित्या सफल करून दाखवले, असे सांगून महाराष्ट्रात विकासाच्या किती योजना आणल्या याचे स्पष्टीकरण देऊन अमित शहा यांनी महा विकास आघाडी वथ टीकास्त्र सोडले.
महा विकास आघाडी म्हणजे "तीन तिगाडा व काम बिगाडा"
उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा पक्ष नकली शिवसेना -राष्ट्रवादी असून काँग्रेस म्हणजे आता अर्धा पक्ष असा उल्लेख करून या तिघांच्या आघाडी चा राज्यात महाविकास आघाडी म्हणजे "तीन तिघाडा काम बिघाडा" असा उल्लेख करीत टीका केली.
चिखलीकरांना मत म्हणजे मोदींच्या स्वप्नातील विकसित भारताला मत - देवेंद्र फडणवीस
देशाच्या विकासात भर टाकण्या साठी राज्यात महायुतीच्या उमेदवाराला दिलेले मत मोदी साठी असून विकासाची खरी गँगा जर राज्यात आणायची असेल तर महायुतीचे उमेदवार भरघोस मतानी विजयी करा असा संदेश उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
महा युती इंजन मोदीजी असून त्या इंजिनाला अनेक बोगी डब्याच्या रूपाने जोडल्या आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे सर्वच इंजिन असून डब्याचा पत्ताच नाही त्या मुळे विकास कसा होणार असा टोला त्यांनी लगावला .
तू माझे पसंत मै तुझे पसंत
चिखलीकर चव्हाण यांच्या दिल जमाई वर बोलताना ते म्हणाले तू माझे पसंत मै तुझे पसंत,असे दोघे एक पक्षात येऊन एकत्र काम करत आहेत म्हणजे नांदेड चा विकास हा आता दूर नाही असे सांगून चिखलीकर हे चिखलीचे त्यामुळे चिखलातच कमळ फुलणार असे म्हणून देवेंद्र यांनी मने जिंकली.
मोदींची विकासाची गॅरंटी म्हणूनच मी मोदीजी सोबत - अशोकराव चव्हाण
जशी मोदींची गॅरंटी तशी नांदेड ची सीट ची गॅरंटी देतो की प्रताप पाटील प्रचंड मतांनी विजयी होणार असून या साठी मी व माझे सर्व समर्थक कामाला लागले असून शंभर टक्के प्रतापराव विजयी होणार असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी उपस्थितां समोर दिला.ही प्रचंड जाहीर सभा म्हणजेयेतो ट्रेलर आभि पिक्चर बाकीहै असा टोला काँग्रेस उमेदवाराला लगावला.नाना पटोले यांचेनाव घेऊन पक्षाचे वाटोळे केल्याचे बोलून चव्हाण यांनी निशाणा साधला.
मोदींच्या अधुऱ्या स्वप्नांची पूर्तता करण्या साठी मला मत द्या - प्रताप पाटील चिखलीकर
भारताच्या विकासा बरोबर जिल्ह्याच्या विकासात भर टाकण्या साठी मला मत म्हणजे मोदीजींना मत होय असे खा चिखलीकर यांनी भावना मांडून भावुक होत मतदारांना उर्वरीत विकासाचे आश्वासन दिले
सभेचे प्रास्ताविक या भागाचे आ.राजेश पवार, यांनी करताना काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार माजी आ.वसंतराव चव्हाण यांच्या नायगावच्या विकासा मागे असलेल्या काळ्या कारनाम्यांचा पाढा वाचून दाखवून उपस्थितांतून जोरदार प्रतिसाद मिळवला, या वेळी आ.राम पाटील रातोळीकर, आ.तुषार राठोड, खा अजित गोपछडे यांनी खुमासदार मनोगत मांडले.
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची नरसी (ता. नायगांव) येथे दि. ११ एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी प्रचार सभा घेण्यात आली असून या सभेला
राज्याचे उपमुख्यमंत्री, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डाँ.भागवत कराड,नांदेड चे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण,खा अजित गोपछडे, माजी मंत्री ,खा.भास्करराव पा.खतगावकर,माजी केंदीय मंत्री सुर्यकांताबाई पाटील,माजी मंत्री माधवराव किन्हाळकर,आ.राम पाटील रातोळीकर ,आ.राजेश पवार,आ.बालाजी कल्याणकर,आ.तुषार राठोड,आ.भीमराव केराम, माजी आ. सुभाष साबणे, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा,माजी आ.अमरभाऊ राजूरकर,माजी आ.अविनाश घाटे,
माजी जिल्हाध्यक्ष वेंकट पाटील गोजेगावकर,
आरपीआय आठवले गटाचे विजय दादा सोनवणे,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हरिहरराव भोसीकर,दिलीपराव धर्माधिकारी ,वसंत सुगावे,,कैलास गोरठेकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष गंगाधर बडुरे ,भाजप जिल्हाध्यक्ष डाँ.संतुक हंबर्डे (उत्तर), किशोर देशमुख (दक्षिण),देविदास राठोड,प्रवीण पा.चिखलीकर, प्रणिता ताई देवरे,पूनम ताई पवार,संघटन मंत्री संजय कोंडगे,मारोतराव कवळे गुरुजी, माणिक लोहगावे,अशोक पाटील मुगावकर,अनिल पा.खानापूरकर,लक्ष्मण ठकरवाड,सर्व भाजप ता अध्यक्ष पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होते.
नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे,शिवराज पाटील होटाळकर,राजेश कुंटुरकर,बालाजी बचेवार,यांनी भव्य सभेचे सुरेख नियोजन केले होते संचलन प्रवीण साले तर आभार श्रावण पाटील भिलवंडे यांनी मानले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा