विहिरीत पडलेल्या मांजराला वाचवण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

गुढी पाडव्या दिवशी गावावर पसरली शोककळा
Went to rescue a cat that fell in a well, unfortunate death of five members of the same family, mourning in the village on Gudi Pada day, nevasa, ahamadnagar,  shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
नेवासा तालुक्यातील वाकडी गावात विहिरीत पडलेल्या मांजराला वाचवण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी दुपारच्या सुमारास घडल्याने वाकडी गावावर शोककळा पसरली आहे. वाकडी येथील अनिल बाबुराव काळे यांच्या वस्तीजवळ वापरत नसलेली 40 ते 50 फूट खोलीची जुनी विहीर आहे. या विहिरीत गाईच्या गोठ्यातील शेण मूत्र सोडले जाते. मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी पाडव्याच्या दिवशी दुपारी 4 वाजता सदर विहिरीमध्ये मांजर पडले, या मांजराला काढण्यासाठी विशाल अनिल काळे वय 28वर्ष  हा विहिरीमध्ये उतरला असता विहिरीत शेण मूत्र मिश्रित पाणी मध्ये बुडू लागल्याने यांचे वडील अनिल बाबुराव काळे वय 55 वर्ष  हे विहिरीत उतरले तेही बुडू लागल्याने यांना वाचवण्यासाठी माणिक काळे वय65 वर्ष  हे विहिरीत उतरले यांना वाचवण्यासाठी यासंदीप माणिक काळे वय 32वर्ष  हा ही विहिरीत उतरला यानंतर यांना वाचवण्यासाठी विजय माणिक काळे वय वर्ष 35 हा ही विहिरीत उतरला यानंतर यांच्याकडे असलेला गडी बाबासाहेब पवार वय40 वर्ष हा ही विहिरीत उतरला. 
ते एकमेकांना वाचवण्यासाठी एका पाठोपाठ एक पाच जण विहिरीत शेण मूत्र पाणी मिश्रित गाळ मध्ये अडकून मरण पावले. विहिरीत मूत्र मिश्रित पाणी असल्याने विहिरीत गॅस तयार झालेला होता. त्यात गुदमरून या सर्वाना मृत्यू आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. तर विजय माणिक काळे वय 35 वर्षे हा विहिरीत गॅसने गुदमरल्यामुळे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच नेवासाचे तहसीलदार संजय बिरादार नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे टीमला सोबत घेऊन घटना स्थळी धावले. आणि तातडीने बचाव कार्य सुरु केले. एकाला जिवंत बाहेर काढण्यात यश आले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर रात्री उशिरापर्यंत मृत्यू देह बाहेर काढण्याचे काम चालू आहे
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !