शेतकऱ्यांत भितीचे वातावरणः वन विभागाने लक्ष घालण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
औंढा नागनाथ - तालुक्यातील अंजनवाडी शेतशिवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने गाईच्या वासराचा फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी शिवारात तडस कि बिबट्याने गाईचे वासरू मारून खाल्ले आसून अंजनवाडी व गोळेगाव परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर आढळून आला असून काही शेतकऱ्यांना हा बिबट्या सारखा आढळून आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. २९ एप्रिल सोमवार रोजी मध्यरात्री हिंस्त्र प्राण्यांने अंजनवाडी शेतकरी बालाजी सोपानराव दराडे यांच्या गाईचे वासरू मारून खाल्ल्याचे उघडकीस आले आहे, यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून या भागात हिंस्त्र प्राण्यांच्या वावरामुळे या भागातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फडशा पाडणारा बिबट्या नसून दुसरा हिंस्त्र प्राणी असू शकतो असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडलिक होरे यांनी सांगितले आहे. वन विभागाने यांची त्वरित पडताळणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
गाईचे वासरू खाल्लेला कोणता हिंस्त्र वन्यप्राणी आहे हे अद्याप कळू शकले नाही मात्र वन विभागाने अंजनवाडी शिवारामध्ये ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा