सर्वत्र घाणीचेसाम्राज्य ; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
![]() |
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
कळमनुरी - शहरातील अनेक महिण्यापासुन अनेक भागात साफ सफाईची समस्या वाढत चालली असुन नाल्या तुडुंब भरल्या असुन नालीचे घाण पाणी रोड वर येत असल्याने नागरिकांना ये जा करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे याकडे पालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.
शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीगार दिसत आहे , यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका वाढला असुन शहरातील लोकप्रतिनिधि झोपेत तर नागरपालिका प्रशासन कोमामध्ये हे विशेष पाहायला मिळते. काही माजी नगरसेवक गुत्तेदारी मध्ये एवढे मग्न आहे की विकासाच्या नावावर बोगस कामाचा सपाटा सुरु ठेवत रोड वर रोड करीत आहेत . परंतु शहरातील साफ सफाई वर मात्र त्यांचे लक्ष नाही झालेल्या निधीतून टक्के वारीने काम घेणे व बोगस काम करुन बिल काढून घेणे या मधेच काही लोकप्रतिनिधी मग्न असल्याची चर्चा जनतेत सुरु आहे.
नगर परिषद निवडणूक लागल्या असत्या तर हेच लोकप्रतिनिधी गल्लीत भेटगाठी घेऊन साफ सफाई बाबत विचारपूस करत होते. परंतु सद्या नगरपालिकेची निवडणूक नसल्यामुळे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. आता जनता ही हुशार झाली असुन माजी व भावी लोकप्रतिनिधीना जनता येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवणार असुन शहरातील साफ सफाईची समस्या नगर परिषद प्रशासनाने लक्ष देऊन करावी अन्यथा प्रत्येक भागातुन कचरा जमा करुन नगरपालिका कार्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन करणार असल्याची ही चर्चा सध्या जनतेमध्ये होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा