कर्मचाऱ्यांना गावपातळीवर काम करतांना येणाऱ्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्याचे निरसन करण्यात आले
शिवशाही वृत्तसेवा हींगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली - जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रात २९ एप्रिल रोजी पुणे येथील राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी जिल्हास्तरीय पर्यवेक्षकांच्या कामकाजाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातही जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय कुमार जठार, राज्य आरोग्य शिक्षण अधिकारी प्रशांत तुपकरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ.सुनील देसमुख, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड, वैद्यकीय अधिकारी सुवर्णा महाले, जिल्हा लेखा व्यवस्थापक शंकर तावडे, अनिता चव्हाण, ज्योती बांगर, मनीषा वडकुते, पारडकर, उद्धव थिटे, सुनील मुनेश्वर, अझर अली, बापू सूर्यवंशी, नरेश पत्की आदी जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कर्मचाऱ्यांना गावपातळीवर काम करतांना येणाऱ्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्याचे निरसन करण्यात आले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी काम करावे. जागतिक महामारी कोविडमध्ये हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी व जनजागृती बाबत वेगळीच ओळख करून दिली आहे. हिंगोली जिल्ह्याने कोविडमध्ये उत्कृष्ट काम केले. विविध योजना व आरोग्य कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तळागाळापर्यंत प्रसिद्धी व जनजागृती करावी. आरोग्याच्या सर्व योजनांची प्रसिध्दी व जनजागृती गावपातळीवर तळागाळापर्यंत करावी आणि सर्वसामान्य जनतेंना त्याचा लाभ मिळवून द्यावा, अशा उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर यांनी बैठकीमध्ये दिल्या.
एनआयसीयूसह सर्व विभागास भेट...राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी त्यांच्या पथकातील राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय कुमार जठार, राज्य आरोग्य शिक्षण अधिकारी प्रशांत तुपकरी यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनआयसीयूसह सर्व विभागास भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके साहेब, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिपक मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा