माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले
शिवशाही वृत्तसेवा हींगोली जिल्हा परिषद, चंद्रकांत वैद्य
हिंगोली, दि. ३० (प्रतिनिधी) - हिंगोली विधानसभेचे काॅंगेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा वाढदिवस ३० एप्रिल रोजी सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले. तसेच विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रम घेण्यात आले. हिंगोली शहरातील त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देणाऱ्यांनी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. यावेळी संजय भैय्या देशमुख, मदन शेळके, कांतराव हराळ, द्वारकादास सारडा, जितू देशमुख, बालाजी गांवडे, गजानन डांगे, अॅड अजय देशमुख, पवन निकम, विशाल माने, नामदेवराव पवार, बाजीराव जूमडे, मदन इ़गोले, शिवाजी जगताप,अजित मगर, सतिश पाचपुते आदी मतदार संघातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा