विविध ठिकाणी मतदान जनजागृतो चे कार्यक्रम होत आहेत
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
बुलढाणा लोकसभेचे२६ एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा निवडणुकी करता मतदान होणार आहे या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे या उद्देशाने प्रशासन प्रयत्न करत असून विविध ठिकाणी मतदान जनजागृतो चे कार्यक्रम होत आहे, त्या अनुषंगाने सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे दि. १२ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता साखरखेर्डा बस स्थानक येथे पथनाट्य सादरीकरण करून प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क व अधिकार बजावला पाहिजे याचा संदेश देण्यात आला.
विविध प्रकारचे गीताचे सादरीकरण करून सर्व कामे सोडून मतदानाचा अधिकार हा बजावला गेला पाहिजे याची माहिती गीतातुन सांगण्यात आली, यावेळी तलाठी संजय शिंगणे होती यांची प्रमुख उपस्थिती होती तर पथनाट्य सादरीकरणात भीमराव थोरवे .सौ सविता भीमराव थोरवे, दिलीप नांदवे, शिवाजी शेषराव जायभाये, रवींद्र निकाळजे, विश्वास यशवंत मोरे, नवनाथ शिवाजी मुरकुट, शुभम नारायण गायकवाड, अधिक कलाकारांचा यामध्ये सहभाग होता,
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा