maharashtra day, workers day, shivshahi news,

वाईच्या डिबीने मोबाईल शोकिनांचे गहाळ झालेले २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे तब्बल १७ मोबाईल केले नागरिकांना परत

गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या तपास
Technical investigation of missing mobiles , wai ,satara ,shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा,वाई तालुका प्रतिनिधी, शुभम कोदे

वाई शहरातील आठवडा बाजारात किंवा इतर ठिकाणी बरेच महागडे मोबाईल शोकिनांचे मोबाईल स्वताच्या हलगर्जी पणा मुळे हरवलेले असतात ते शोधुन सुध्दा त्यांना सापडत नाहीत .मग त्याच्या तक्रारी वाई पोलिस ठाण्यात दाखल होतात . या दाखल सर्व तक्रारी विशेष शोध मोहिमे साठी वाईच्या डिबी विभागाकडे वर्ग केल्या जातात .पण हे हरवलेले मोबाईल ज्यांना सापडता ते सात ते आठ महिने वापरात आणत नसल्याने त्याचा तपास करणे अवघड जाते .ज्या वेळी या मोबाईल मध्ये नवीन नंबरचे सिमकार्ड टाकुन ते वापरात येते त्या क्षणी वाईच्या डिबीला त्याचे लोकेशन येते आणी मग डिबीचे अधिकारी आणी पोलिस कर्मचारी तिथ पर्यंत पोहचुन 
मोबाईल ताब्यात घेतात .डिबी विभागासह पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी आणी पोलिस कर्मचार्यांची टिम हि नेहमीच अलर्ट असते याचा मला अभिमान आहे .
असे गौरव उदगार वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांनी काढले  वाई पोलीस ठाणेचे हद्दीमधुन गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या तपास करुन शोध घेण्याच्या सुचना वाई पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक  जितेंद्र शहाणे यांनी तपास पथकास दिल्या नंतर सीईआयआर पोर्टलचे माध्यमातुन वाई पोलीस ठाणेचे हद्दीतुन गहाळ झालेले मोबाईल फोनचा निरंतर शोध घेतला असता, आयफोन, समसँग, सारख्या नामांकित ब्रॅण्डचे सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीच्या १७ मोबाईल फोनचा विविध ठिकाणाहुन शोध घेऊन सदरचे मोबाईल फोन मुळ मालकांना परत करण्यात आले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शना खाली जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई, पोलीस सहा पोलीस निरीक्षक वैभव पवार,उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, सुधीर वाळुंज,श्रावण राठोड  पो.शि प्रसाद दुदुस्कर, राम कदम,  विशाल शिंदे यांनी केली आहे. 
वाई पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !