स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - जेसीबी चोरी करून विकी करणारे व विकत घेणारे परभणी जिल्हयातील दोन तर बीड जिल्हयातील एक अशा तीन आरोपींना अटक करुन २० लाख रुपये किंमतीची जेसीबी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील इंजनगाव येथून सोमवारी हस्तगत केली आहे.
वसमत ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या इंजनगाव पुर्व शिवारातील आखाडयावर अंबादास भोरे रा. आडगाव लासीना यांचे मालकिची डी. एस्क. कंपनीची जे.सी.बी. मशीन किंमत २० लाख रूपये ठेवलेली असतांना कोणीतरी अज्ञात आरोपींनी जे.सी.बी.चोरी करून नेली होती.
सदर जे.सी.बी. चा फिर्यादी यांनी आजुबाजुला शोध घेतला परंतु मिळून आली नाही. फिर्यादी यांनी त्याबाबत पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे दिलेल्या फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या संदर्भात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या होत्या. त्यावरून विकास पाटील यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलु आणि त्यांचे पथक नमुद करुन त्यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन संजय अंबादास इंगोले रा. देगाव ता. पुर्णा यांनी त्यांचे ईतर साथिदांरा मार्फत मिळुन केल्याबाबत पथकाला माहीती मिळाल्याने राजेश मलपिलु आणि त्यांचे तपास पथकाने सोमवारी आरोपी संजय इंगोले यास ताब्यात घेवुन विचारपुस करता तपासात आरोपीने त्याचे ईतर साथीदार यांचेसह मिळुन गुन्हा केल्याची कबुली दिली.
तपास पथकाने गुन्हयात सहभागी ईतर दोन आरोपी अल्लाबक्ष मेहबुब पठाण रा. पाथरी जि.परभणी व युवराज उत्तम कठाळे रा. दहवंडी ता. शिरूर जि.बिड यांना ताब्यात घेवुन आरोपींच्या ताब्यातुन फिर्यादी यांचे चोरीला गेलेले डी.एस्क. कंपनीची जे.सी.बी. मशीन किंमत वीस लाख रूपये जप्त करून तिन्हा आरोपींना जे.सी.बी. मशीनसह पुढील तपासकामी वसमत ग्रामीण पोलिस यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार शेख बाबर,
गजानन पोकळे, किशोर कातकडे, विठठल काळे, गणेश लेकुळे, तुषार ठाकरे, दिपक पाटील, दत्ता नागरे, अशोक
काकडे यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा