सांगोल्यात वर्दळीच्या रस्त्यावर पोलिस आणि जीप चालकाचा थरार
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा प्रतिनिधी राज सारवडे)
सांगोला मंगळवेढा व सांगोला पोलिसांनी फिल्मी स्टाइलने पाठलाग करून अवैध विदेशी दारू घेऊन सुसाट वेगाने जाणाऱ्या जीपचालकास पाठलाग करून सांगोला शहरातील धनगर गल्लीत शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पकडले.
सांगोल्यात वर्दळीच्या रस्त्यावर पोलिस आणि जीपचालकातील अर्धा तास चाललेला थरार पाहून नागरिक घाबरले होते. हा गुन्हा मंगळवेढा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने जीपचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवेढा पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत सुरू होती.सांगोला मंगळवेढा रोडवर शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एमएच-४५-एएल-८४१७ ही बोलेरो जीप आंधळगाव चेकपोस्टवर तपासणीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने सुसाट गाडी पळविली. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.
चालकाला ताब्यात घेतले.
सांगोल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांना ही माहिती मिळाली. तेही पोलिस अधिकारी, कर्मचारी यांसमवेत जीपचा पाठलाग करताना ही जीप शहरातील धनगर गल्ली येथे सायंकाळी सातच्या सुमारास पकडून जीपसह चालकास ताब्यात घेतले.
यावेळी ठिकाणी बघ्याची मोठी गर्दी झाल्याने नेमके काय घडले याची नागरिक चर्चा करीत होते. पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता जीपमध्ये अवैध देशी-विदेशी दारू असल्याचे समोर आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा