मिरची लागवडीसाठी नर्सरी बुकिंग साठी हाऊसफुल्ल
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन जिल्हा प्रतिनिधी, मजहर पठाण
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी व परिसरात खरीप हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या मिरची लागवडीला आतापासूनच प्रारंभ झाला असून आठवड्याभरापासून आतापर्यंत वीस ते पंचवीस हजार हेक्टरवर ठिबक सिंचनावर मल्चिंग कापडाच्या सहाय्याने मिरची लागवड झाल्याचा अंदाज भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात दिसून येत आहे भोकरदन तालुक्यातील वालसावंगी हे गाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असल्याने दरवर्षी परिसरात 50 ते 60 हजार हेक्टरवर मिरची लागवड केली जाते व परिसरात सर्वात मिरची लागवडीसाठी प्रसिद्ध असल्याने दरवर्षी परिसरात 50 हजार हेक्टरवर मिरची लागवड होते परंतु गेल्या वर्षी सुरुवातीपासूनच मिरचीला 50 ते 60 रुपये किलोचा हमीभाव मिळाल्याने व शेवटपर्यंत मिरचीचे भाव महाराष्ट्र आंध्रप्रदेश, कर्नाटक ,तेलंगणा मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यात टिकून राहिले त्यामुळे शेतकरी मिरचीचा चांगला भाव घेऊन मलामाल झाले आहे.
असे चित्र गेल्यावर्षी दिसून आल्याने यावर्षी मात्र शेतकऱ्यांना हिरवी मिरची मालामाल करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे शेतकऱ्यांनी अगोदरच दुप्पट मिरची लागवड वाढवली असून आतापासूनच शेतकऱ्यांनी मिरची लागवडीसाठी मोठी कंबर कसली असून परिसरातील वालसावंगी, धावडा, पारध ,पिंपळगाव रेणुकाई, अन्वा जळगाव सपकाळ लेहा, वडोदतांगडा आदी परिसरात मिरची लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी सुरुवातीपासूनच मिरचीला मार्केटमध्ये आवक कमी झाल्याने हजारो हेक्टरवरील मिरची लागवड केली तसेच शेतकरी एप्रिल पासूनच लागवड करीत आहे त्यामुळे यावर्षी मात्र शेतकऱ्यांना हिरवी मिरची मालामाल करणार असल्याचे चित्र दिसत आहे.
*
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा