दोन्ही आरोपींना मेहकर न्यायालयानत पंधरा दिवसांची न्यायालयीन - कोठडी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
रेतीच्या ट्रॅक्टरसाठी दरमाह ३५ हजारांचा हप्ता वसूल करण्याकरिता - सुरुवातीच्या हप्त्याचे ३५ हजार रुपये घेणाऱ्या लाचखोर तहसीलदार - सचिन जैस्वाल व त्याचा चालक मंगेश कुल्थे याला मेहकर न्यायालयाने २९ - एप्रिलपर्यंत पंधरा दिवसांची न्यायालयीन - कोठडी सुनावली आहे. तहसीलदार सचिन जैस्वाल- व चालक मंगेश कुलथे याला १२ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात ३५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत- प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. शासकीय निवासस्थान आणि परभणी येथील निवासस्थानात एसीबीच्या पथकांना सुमारे ४६ लाखांची रोकड सापडली. ही रक्कम
जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, तहसीलदान सचिन जैस्वाल आणि त्याचा चालक मंगेश कुलथे या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर आज त्यांना मेहकर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती 'एसीबी'चे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांनी दिली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा