भागवत कथेस सुरुवात
शिवशाही वृत्तसेवा , हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - शहरालगत असलेल्या अंतुलेनगर येथील जागृत संकट मोचन हनुमान मंदिरात श्रीमद भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण, व अखंड हरिनाम सप्ताहास मंगळवारी (ता.१६) पासून सुरुवात झाली आहे.
१६ ते २३ एप्रिल या कालावधीत सात दिवस हनुमान जयंती निमित्य हरिपाठ , पारायण , भागवत कथा , हरी कीर्तन असे भरगच्च धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असल्याने परिसरातील वातावरण धार्मिक झाले आहे. सकाळी साडे सहा ते आठ पर्यन्त ज्ञानेश्वरी पारायण सुरू असून यामध्ये महिला, पुरुष असे मिळून शंभर पेक्षा अधिक भाविक सहभागी झाले आहेत.या भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे कमलाबाई रमेश पवार हे मुख्य यजमान आहेत. त्यांच्यामुळेच यंदा हा रामनवमी ,हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे.
त्यानंतर हभप जनार्धन शास्त्री महाराज यांचे दुपारी एक ते चार यावेळेत भागवत कथा सुरू आहे. भागवत कथा श्रवण करण्यासाठी परिसरातील भाविकांची पहिल्याच दिवशी लक्षणीय उपस्थिती दिसून आली. एकीकडे निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले असतानाही भाविकांचा ओढा ही धार्मिक कार्यक्रमाकडे वाढला आहे यावरून स्पस्ट होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा