निवडणूकिच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
औंढा नागनाथ - निवडणूक आयोगाच्या वतीने हिंगोली लोकसभा निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत असून, त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा-जिंतुर रोडवरील रामेश्वर येथील तपासणी नाक्यावर ये-जा करणाऱ्या खासगी वाहनांसह एसटी महामंडळाच्या बसेसचीही तपासणी करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाच्या वतीने औंढा नागनाथ तालुक्यात विविध ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून, या नाक्यांवर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी या कर्मचाऱ्यांकडून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी नाक्यांना निवडणूक निरीक्षक एम एस आर्चना , अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील ,उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार हरीश गाडे ,पोलीस निरीक्षक जीएस राहिरे,गटविकास अधिकारी गोपाळ कल्हारे यांनी आतापर्यंत भेटी दिल्या असून, नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही आहेत.
नोडल ऑफिसर करण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राम चौधरी , ग्रामसेवक, पी.एस. लोणकर , कृषी सहाय्यक , मुंजाजी काळे, जी. एन. गच्चे, सोरते ,अक्षय राठोड, पोलीस जमादार संदीप टाक, टी आर राठोड, विजय कालवे, होमगार्ड कर्मचारी, व्हिडिओग्राफर बगाटे किरण यांच्या पथकाद्वारे प्रत्येक वाहनाची काटेकोरपणे तपासणी चालू आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा