लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत उच्च असामाजिक तत्वांना वेळीच जेरबंद
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
औंढा नागनाथ - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत उच्च असामाजिक तत्वांना वेळीच जेरबंद करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागातर्फे जोरदार पूर्वतयारी केली जात आहे, त्या अनुषंगाने नुकतेच नागनाथ मंदिर परिसरात बटालियन कमांडर सीआयएसएफ कंपनी यांच्या नेतृत्वात मतदान केंद्रावर हल्ल्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
aaaa
यामध्ये जमावकडून बूथ कॅपचर करून मतदान अधिकारी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर तात्काळ नियंत्रण मिळवून जेरबंद करण्यात आल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले .यावेळी सिआयएसएफचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र कुमार, औंढा पोलीस निरीक्षक जि. एस. राहीरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार अवस्थी, सहायक पोलिस निरीक्षक अंकुश सेहरावत, बालाजी महाजन यांच्यासह सिआयएसएफचे जवान सहभागी झाले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा