maharashtra day, workers day, shivshahi news,

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित"संघर्ष योद्धा"मनोज जरांगे पाटील हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ला होणार प्रदर्शित...

मनोज जरांगे पाटील बनले महाराष्ट्राच्या मराठा बांधवांच्या गळ्यातील ताईत

Sangharsh Yoddha" Manoj Jarange Patil ,  Directed by Shivaji Doltade movie , Shirur , pune ,shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, शिरूर तालुका प्रतिनिधी फैजल पठाण 

मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली असून या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात अंतरवाली सराटी येथून होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा "संघर्ष योद्धा "हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे यासाठी रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे ,नर्मदा सिने व्हिजन , तसेच डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर देशा ने पाहिला व अनुभवला आहे.

केवळ व्यक्तीसाठी न लढता, समाजासाठी लढताना अख्ख्या महाराष्ट्राच्या मराठा बांधवांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. अनेक आंदोलने व उपोषणे केली परंतु कधी हार मानली नाही अशा अनेक गोष्टींचा या चित्रपटा मधे विचार केला गेला आहे. या चित्रपटासाठी सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गीत गायले आहे. तर या चित्रपटात संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे ,सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अनघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !