maharashtra day, workers day, shivshahi news,

देऊळगाव गुजरी मध्ये हृदयाला हादरून टाकणारी घटना पत्नी व मुलीची हत्या करून स्वतःची जीवन यात्रा संपवली

थरारक घटनेमुळे देऊळगाव परिसर हादरले 

He ended his life by killing his wife and daughter , Soygaon , shivshahi news.

 
शिवशाही वृत्तसेवा , सोयगाव तालुका प्रतिनिधी रईस शेख
जामनेर तालुक्यातील... देऊळगाव गुजरी मध्ये अंगाला थरका उडवणारी हत्याकांडची घटना  पती-पत्नीच्या आपसीवादातून पतीने आपल्या पत्नीचे व चिमुकलीचे सैराट फेम हत्या करून पतीनेही स्वतःची जीवन यात्रा संपवली घटनेने आज संपूर्ण देऊळगाव परिसर हादरले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की देऊळगाव गुजरी येथील पोलीस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह लॉकडाऊन काळामध्ये दुधलगाव तालुका मलकापूर येथील विशाल मधुकर झनके याच्याशी झाले होते. आनंदाने चाललेल्या यांचा संसार वेलीवर दोन चिमुकल्या मुली आपत्यांच्या माध्यमाने फुले उमलली. विशाल झनके याला दारूचे व्यसन होते. सुरुवातीला पती-पत्नीचे दारूच्या व्यसनामुळे छोटी मोठी कुरबुर व्हायची.
परंतु अलीकडच्या काळात विशालने प्रतिभाला मानसिक व शारीरिक छळ करणे सुरू केले. चिमुकल्या दोन मुली पतीला दारूचे व्यसन व होणारा त्रास या सर्व गोष्टीमुळे गेल्या चार महिन्यापासून प्रतिभा पतीला सोडून माहेरी निघून आली. येताना सोबत आपली अकरा महिन्याची तानुली दिव्या नावाची मुलगी घेऊन आली. मध्यंतरी विशालने दोन-तीन वेळा येऊन प्रतिभाची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला परंतु दारूचे जडलेले व्यसन व नेहमीचा होणारा त्रास यामुळे प्रतिभा कंटाळली होती. प्रतिभा ने दोन-तीन वेळा विशालला सासरी येण्यास नकार दिला.
 दी.१२ एप्रिल रोजी माहेरी प्रतिभाचे आई-वडील शेतात गेले असताना विशाल परत प्रतिभा ला नेण्यासाठी व समजूत घालण्यासाठी आला. त्यावेळी प्रतिभाचे माहेरी आजोबां व्यतिरिक्त कोणीही नव्हते. आजोबा वयोवृद्ध व थकलेले असल्याने त्यांना या कोणत्याही गोष्टीची कल्पना नव्हती.
विशालने एकांताचा फायदा घेत प्रतिभाला घरी नेण्यासाठी जबरदस्ती केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रतिभाने येण्यास नकार दिल्यावर दोघांमध्ये वाद निर्माण होऊन विशालचा राग अनावर झाल्याने विशालने धारदार शस्त्राने प्रतिभा व चिमुकल्या दिव्याचा गळा कापून हत्या केली व 
तेथून फरार झाला. कुणीतरी फोन द्वारे प्रतिभाच्या वडिलांना माहिती कळवताच प्रतिभाचे आई-वडील शेतातून धावत घरी आले. व त्यांना आपली मुलगी प्रतिभा व नात दिव्या रक्ताच्या ठळक पडलेले आढळले. प्रतिभाचे वडील स्वतः पोलीस पाटील असल्याने व गावात त्यांची प्रतिष्ठा असल्याने सदर वार्ता वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच जळगाव येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाचोरा येथील विभागीय पोलीस आयुक्त, यांचे ताफ्यासह फत्तेपुर पोलीस स्टेशन चे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी देऊळगाव कडे धाव घेतली. वृत्त लहेपर्यंत सदर घटनेचा तपास व गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. 
यासंदर्भात विशाल झनके यांचे गावी चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, विशाल झनके याने सुद्धा स्वतःचे गावी एका विहिरीमध्ये कमरेला दगड बांधून स्वतःची जीवन यात्रा संपविल्याची चर्चा अनेक नातेवाईकांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे.
 या संदर्भात परिसरात अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आले असून अंगाचा थरका उडवणार या घटनेचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपुर पो.स्टे.चे स.पो.नि. गणेश फड व त्यांची टीम करीत आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !