आरोपीवर नांदेड जिल्हयात घरफोडीचे १० गुन्हे दाखल
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत चंद्रकांत वैद्य
हिंगोली - घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी निष्पन्न करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी आरोपी जेरबंद केला आहे. आरोपीने हिंगोलीसह नांदेड, लातुर जिल्हयात अनेक घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे.
शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कळमनुरी हद्दीत पेट्रोलींग करीत आरोपीची माहीती घेत असतांना त्यांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार श्रीकांत सर्जेराव चव्हाण, रा. धानोरा, ता. कळमनुरी याने त्याचे इतर साथीदारांसह कळमनुरी हद्दतील सालेगाव, पिंपळदी व कळमनुरी शहरात घरफोड्या केल्या आहेत अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस पथकाने धानोरा येथे सदरील आरोपीचे राहते घरी शोध घेतला असता नमूद आरोपी हा त्याचे राहते घरी मिळून आला.
पोलीसांनी आरोपी श्रीकांत सर्जेराव चव्हाण यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने व त्याचा साथीदार मित्र धनंजय बापुराव भोसले, रा. ताडपांगरी, ता.जि. परभणी व जनार्धन मनोहर भोसले, रा. कळमनुरी, उमेश सर्जेराव भोसले, रा. कळमनुरी यांनी मिळून कळमनुरी तालुक्यात घरफोड्या केल्याचे सांगुन हिश्याला आलेला ४० ग्रॅम सोन्याचे दागीने किंमत दोन लाख ८० हजाराचा मुद्देमाल काढुन दिला.
सदर आरोपीवर नांदेड जिल्हयात घरफोडीचे १० गुन्हे दाखल असुन, लातुर जिल्हयात सुध्दा घरफोड्या केल्याचे प्रथम दर्शनी माहिती मिळाली आहे. तसेच हिंगोली जिल्हयातील यापुर्वीच्या ४ घरफोड्यामध्ये सदर आरोपी फरार होता. सदर आरोपीकडुन अदयाप पर्यंत ३ घरफोडीची उकल झाली असुन, अजुन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदर आरोपीस कळमनुरी येथे पुढील तपासकामी हजर केले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार, पांडुरंग राठोड, राजु ठाकुर, नितिन गोरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे, रविना घुमनर यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा