धावडा परिसरात बनवले चार कृत्रिम पाणवठे, प्राण्यांची भटकंती थांबणार
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन तालुका प्रतिनिधी, मजर पठाण
वन्य प्राण्यांना होणार फायदा - अंतर्गत वनपरिक्षेत्र जालना उत्तर (प्रा) नियतन क्षेत्र भोकरदन वनविभागामार्फत मेहगाव, धावडा वनक्षेत्रात वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी चार कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्यासाठी होणारी वन्यप्राण्यांची भटकंती थांबणार आहे.
मेहगाव, धावडा या वनक्षेत्रात हरीण, रोही, ससे, लांडगे, कोल्हे, तडस, बिबटे, अस्वल आदी प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यंदा सुरुवातीला अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जानेवारी महिन्यातच विहिरी, नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी आपली तहान भागवण्यासाठी भटकंती करीत असल्याचे दिसून आले होते. या प्राण्याच्या भटकंतीदरम्यान कुठलीही जीवितहानी होऊ नये, यासाठी वनविभागाने चार पाणवठे तयार केले आहेत.
गेल्या तीन वर्षांपूर्वी या वनक्षेत्रात प्राणीप्रेमी आणि एका संघटनेतर्फे एक पाणवठा बांधला होता.
त्यात दरवर्षी पाणी टाकून प्राण्याची तहान भागवली जात होती. परंतु, यंदा सर्वत्र पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा हे पाणवठे बांधण्यात आले आहे. त्यामुळे प्राण्यांना चांगला फायदा होणार
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा