लोकसभा मतदार संघातून २००पेक्षा अधिक वाहने मुंबईकडे रवाना
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - हिंगोली लोकसभा मतदार संघातून (शिंदेगट) शिवसेना पक्षाकडून उमेदवारी कायम ठेवण्यासाठी हेमंत पाटील यांनी आपल्या दोनशे पेक्षा अधिक वाहनातून लोकसभा मतदार संघातील समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मंगळवारी रवाना झाले.
हिंगोली लोकसभा मतदार संघातून शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तिव्र नाराजीचा सुर काढला होता. मागील पाच वर्षात कार्यकर्त्यांची कामे केली नाहीत, कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले नाहीत असा आरोप करून त्यांनी पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. त्यासाठी भाजपाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची नांदेड विमातळावर भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी सदर जागा शिवसेनेची (शिंदेगट) असल्याचे सांगितल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी गप्प बसले.
दरम्यान, त्यानंतर मंगळवारी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या लोकसभा मतदार संघातील विविध गावांमधून समर्थक एकत्र आले. या समर्थकांनी पाटील यांची उमेदवारी कायम ठेवावी अशी मागणी करण्यासाठी थेट मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सुमारे २०० वाहनांतून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन विद्यमान खासदार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवण्याची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यमान खासदार पाटील यांची उमेदवारी कायम राहणार का याची उत्सूकता महायुतीच्या घटक पक्षांना लागली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा