विकासासाठी मी बांधील असल्याची ग्वाही सुद्धां सुभाष चव्हाण यांनी दिली
शिवशाही वृत्तसेवा, वाई तालुका प्रतिनिधी शुभम कोदे.
वाई . पांडेवाडी ता. वाई येथील ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत एकच फॉर्म आल्याने सुभाष चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगर कुशीत बसलेले पांडेवाडी या गावी एकूण सात सदस्यांची ग्रामपंचायत असून एकीने राहणारी ग्रामपंचायत म्हणून पांडेवाडी ग्रामपंचायतीचा तालुक्यासह जिल्ह्यात नावलौकिक आहे.
या निवडी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाईच्या नायब तहसीलदार वैशाली जायगुडे-घोरपडे हजर होत्या.
त्यावेळी पांडेवाडीच्या ग्रामसेवक शुभांगी चव्हाण, पांडेवाडी गावचे सरपंच भाऊसाहेब फणसे, माजी उपसरपंच पंढरीनाथ दळवी, ग्रामपंचायत सदस्य सुंदराबाई मोहिते, सुजाता पिसाळ, शिल्पा चव्हाण, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
नवनिर्वाचित उपसरपंच सुभाष चव्हाण यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातून, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी शाल श्रीफळ पेढे भरवून शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच सुभाष चव्हाण म्हणाले की पांडेवाडी गावाला शोभेल असे काम करून मिळालेल्या संधीचे माझ्यातून नक्कीच सोने होईल यातील मात्र शंका नसून गावच्या विकासासाठी मी बांधील असल्याची ग्वाही सुद्धां त्यांनी यावेळी दिली.
यावेळी माजी उपसभापती शंकरराव आप्पा शिंदे, निलेशशेठ देशमाने, उत्तम राजपुरे, विनोद साबळे, रवींद्र देशमाने, शंकर दळवी, संतोष मोहिते, अन्नपूर्णा कोल्हटकर, आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा