पत्रकार परिषदेत कॉम्रेड विजय गाभणे यांची केंद्रसरकारवर टीका
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी हुकूमशाही सुरू केली असून ही हुकूमशाही उखडून टाकण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे व्यक्तव्य कॉम्रेड विजय गाभणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. आता कॉम्रेड ही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येथील एका खाजगी हॉटेल मध्ये सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी सिटूच्या प्रदेश सचिव कॉ. संगीता गाभणे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी कॉ. विजय गाभणे बोलताना पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सरकारने देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आणले आहे. देशातील कामगार, शेतकरी , शेतमजूर देशोधडीला मिळाला असताना केवळ आश्वासनाची जुमले उभारण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याने या जुमलेबहाद्दर आणि हुकूमशाहीला उघडून काढण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात असून निश्चितपणे आपला विजय होईल असा विश्वास हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड विजय गाभणे यांनी आज व्यक्त केला.
पुढे बोलताना कॉ. विजय गाभणे म्हणाले आमचा जाहीरनामा हा लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संविधानाचे रक्षण करणे, स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे, कामगार ,कर्मचारी योजना , कर्मचारी यांना कायम करणे आणि खाजगीकरण रोखणे, महिलांच्या आर्थिक, सामाजिक , उन्नतीसाठी आणि अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलले. जीएसटी करवाढ , महागाई या धोरणाचा विरोध करणे, लहान मध्यम उद्योजकांचा विकास करणे व शिक्षणाक्षेत्रातील लूट थांबविणे , घटनेत रोजगाराचा अधिकार मूलभूत हक्कात समाविष्ट करणे , जातीनिहाय जनगणना करून त्यांचा त्याला न्याय मिळवून देणे असा आहे . केंद्र सरकारकडून आतापर्यंत गेल्या दहा वर्षात कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्यांची थट्टा करण्यात आली आहे .
यावेळी पत्रकाराशी संवाद साधताना कॉम्रेड उज्वला पडलवार यांनी केंद्र सरकारच्या हुकूमशाहीवर सरकून टीका केली .
देशातील महिला सुरक्षित नाहीत. महिलांवर अत्याचार होतात. त्यांचे खून होतात. त्यांच्या नग्न धिंड काढल्या जातात मात्र मोदी सरकार यावर उपाय योजना करत नाही . त्यांना महिलांच्या सुरक्षेची काळजी नाही. या देशातील गोरगरीब जनतेची चिंता नाही त्यामुळे या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करून सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या कॉ. विजय गाभणे यांचा विजय व्हावा असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गावपातळीवर संघटन मजबूत करून त्यानुसार लोकसभा मतदार संघात कॉर्नर बैठका, घरोघरी प्रत्यक्ष मतदारांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. मतदारातून ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे विजय गाभणे यांनी सांगितले.
त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मतदार राजाकडून चमत्कार घडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे या चौरंगी लढतीत नक्कीच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष टक्कर देणार असल्याचे शेवटी सांगितले .या विजय गाभणे यांच्या मुळे लोकसभेत विळा हातोडाचा कोणाला फटका बसणार हे मतमोजणी नंतरच स्पस्ट होणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा